एशियन पेंट्स हा सर्वात उत्तम शेअर्स पैकी एक होता.या मध्ये अनेक व्यक्तींना या शेअर्स घेण्याची इच्छा होत असे. एशियन पेंट्सचा शेअर्स हा नेहमीच कित्येक लोकांना चांगला परतावा देऊन जात असे. पण सुप्टेंबर महिन्यात आलेल्या निकाल पाहून सर्व जण अचंबित झाले. आणि आज एशियन पेंट्स शेअर्स हा जवळपास आठ टाक्याने खाली आला. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
एशियन पेंट्स (Asian Paints) ही लार्ज कॅप कंपनी आहे. याचा करोबर खुप मोठा आहे. पण या तिमाही रिपोर्ट नुसार कंपनीची कामगिरी खुपच खराब राहिली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार कंपनीची कामगिरी सर्वच बाजूनी निराशा जण राहिली आहे. यामळे आज एशियन पेंट्स शेअर्स जवळ पास ९. २२ टक्के खाली कोसळा गेल्या एक वर्षाच्या सर्वात खालच्या पातळी जवळ हा शेअर्स आला आहे.
सकाळच्या सत्रात एशियन पेंट्सचा शेअर्स जवळपास २५१५ इतक्या खाली आला होता. या एक वर्षीच्या सर्वात खालची पातळी म्हणजे २५०६ इतक्या पर्यंत आला होता. या पाठीमागे कंपनीची कामगिरी कारणीभूत आहे. सर्वच ठिकाणी कंपनीने निराशाजन काम केले आहे.
एशियन पेंट्सची आर्थिक कामगिरी थोडक्यात
एशियन पेंट्ससाठी सप्टेंबर 2024 हा तिमाही महिना वाईट गोष्टी पैकी के असणार आहे. वस्तुंना कमी मागणी यामुळे ४४ टक्क्याने सर्वात कमी मागणी अली यामुळे कंपनीच्या एकूण महसुलात ५ टक्के पेक्षाहुन अधिक घट झाली. तसेच देशातर्गत सुध्दा कंपनीच्या एकूण वृद्धी मध्ये सुद्धा निराशा जनक कामगिरी राहिली आहे.
एशियन पेंट्ससाठी सप्टेंबर मध्ये एकूण निव्वळ नफा हा ६९४. कोटी आहे. हा नफा गेल्यावर्षी जवळपास 1,205.42 कोटी होता. त्सेध कंपनीचा गेल्यावर्षी एकूण महसूल 8,451.93 कोटी रुपया होता. या वर्षी 5.3 टक्के घसरून तो 8,003.02 कोटी रुपये झाला.घसारापूर्वी एकत्रित नफा, व्याज आणि कर (PBDIT) 27.8 टक्क्यांनी घसरून 1,239.5 कोटी रुपये झाला.
एशियन पेंट्सवर ब्रोकरेजचे मत
एशियन पेंट्सची (Asian Paints) निराशजनक कामगिरी मुळे अनेक दिग्ग्ज ब्रोकरेजनि एशियन पेंट्सची रेटिना कमी केली आहे. Nomura तटस्थ रेटिंग दिले आहे आणि प्रति शेअर 2,500 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.तसेच Morgan Stanley नि सुद्धा रेटिंग कमी केली आहे. त्यांनी तर अंडर फेरफॉम असे म्हंटले आहे. तसेच यांनी २५२५ इतकी कमी प्रति शेअर अशी किंमत केली आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यांचे म्हणे आहे कि सर्व पेंट उदयोग कमी प्रमाणत काम करत आहेत पण एशियन पेंट्सने सर्वांपेक्षा सुद्धा कमी कामगिरी केली आहे.
एशियन पेंट्सचा शेअर्स कामगिरी
एशियन पेंट्स (Asian Paints) कंपनी सर्वात मोठी आहे. तरी सुद्धा गेल्या काही दिवसापासून एशियन पेंट्सचा शेअर्स सातत्त्याने खालच्या पातळीवर काम करत आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने तो लाल रंगात बंद होत आहे. यामुळे गुंतवणूक दाराचे नुकसान होताना दिसत आहे. गेल्या एक महिन्याचा विचार केला गेला तर जवळपास १६.९५ टक्के नकारत्मक परतावा दिला आहे. तसेच संपूर्ण एक वर्षाचा विचार केला तर १७.९६ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. आजच्या घसरणीनंतर हा शेअर्स गेल्या वर्षीच्या पातळी जवळ आला आहे.




