नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. बँकेचे पासबुक, चेकबुक, आर्थिक देवाणघेवाणीचे कागदपत्रे, गुतूंवणूक केलेली कागदपत्रे हि नेहमी तिजोरीत ठेवलेल्या श्री यंत्राजवळ किंवा कुबेरयंत्राजवळ ठेवावीत. मित्रांनो धन, पैसा नेहमी वाढतो. नेहमी बँकेमध्ये पैसे जमा करताना मनातल्या मनात माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र जप करा बोला. माता लक्ष्मीचे मंत्र जसे कि ओम महालक्ष्मीये नमः। किंवा ओम रीं श्रीमं महालक्ष्मये नमः। ह्यातील कोणताही एक मंत्र बोलला तरी चालेल.
बँकेत पैसे जमा करताना ह्या दोन्हीपैकी कोणताही सोपा वाटेल तो मंत्र आपण जप करा. मित्रांनो पैस्यात सातत्याने वाढ होते. एकाद्या शुभ मुहूर्तावर जसे कि गुरुपुष्यनक्षत्रावर तसेच रवीपुष्यनक्षत्रावर वडाच्या झाडाचे एक ताजे पान आपण घरी आना ते स्वच्छ धुवून त्यावर हळदीने एक स्वस्तिक बनवून ते आपल्या घरात किंवा तिजोरीत ठेवा, पैसा वाढतो.
मित्रांनो आपले दुकान आहे कार्यलय किंवा एखादी फॅक्टरी असेल ते उघडताना कुबेरापती शिवशंकर आणि माता लक्ष्मीचे ध्यान अवश्य करा. तुमच्या उद्योगधंद्यात नेहमी वाढ होईल. आपल्या घरात जर पारद शिवलिंग असेल तर नियमितपणे ह्या वस्तूवर त्राटक करा त्राटक म्हणजे एकटक त्याकडे पाहणे त्यानंतर प्रार्थना करा धनसंपदा मिळण्याची, प्रार्थना नक्की मान्य होते. मित्रांनो हे जे आपण उपाय सांगत आहोत ते अनेक लोकांनी केले देखील असतील परंतु त्याचे फळ मात्र मिळाले नाही असे का.
मित्रांनो कधीही कोणाचाही आत्मा दुखावू नका. मन दुखावू नका, त्यांचा जो तळतळाट आपल्याला लागतो जो श्राप आपल्याला लागतो प्रगतीमध्ये बाधक बनतात. नेहमी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्या त्यासाठी त्यांना प्रसन्न करा. माता लक्ष्मीची जेव्हा देखील पूजा करणार तेव्हा हि पूजा करताना लक्ष्मीच्या साधकांनी आपण एखादे आसन नक्की अंथरा हे आसन हे पिवळ्या रंगाचे, लोकरीचे असेल तर अतिउत्तम कारण हे लक्ष्मीला सिद्ध असते त्याने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
सोबतच स्फटीकांची माळ असेल ह्या मळांवरती महालक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा, महालक्ष्मीला कधीही तुळशीची पाने किंवा मंजिऱ्या वाहू नका. ह्या छोट्या छोट्या चुकाच आपल्या घरात लक्ष्मीला टिकू देत नाहीत. जेव्हा जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करत आहात त्यावेळी कमलगठ्ठा म्हणजे कमळाचे बिया असतील, बत्ताशे असतील, काळे तीळ असतील, तूप देशी गाईचे याचा वापर अनिर्वाय पद्धतीने करा लक्ष्मी प्रसन्न होते. घराची नेहमी स्वच्छता ठेवा लक्ष्मी घरात टिकून राहते.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




