जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे, Benefits of drinking cumin water.
फूड

उपाशी पोटी रोज सकाळी प्या जिऱ्याचे पाणी. १० जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे.

आपल्या रोजच्या मसाल्यातील घटक म्हणजे जिरे. जिरे हे फक्त मसाल्याला चव देणारा घटक नसून त्याचा उपयोग हा इतर कम साठी सुद्धा होऊ शकतो. आज आपण जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जिऱ्याचे सेवन कश्या पद्धतीने करायचे ज्या मुळे आपल्याला चागले फायदे जिऱ्याचे पाणी पिण्याने मिळतील.

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे.

बऱ्याच लोकांना जिरा हा फक्त मसाल्यातील घटक आहे इतपर्यंतच माहिती आहे. पण जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे असंख्य आहेत. जिऱ्याच्या पाण्या मध्ये अँटिओसीडन्ट, खनिजे, जीवनसत्वे या घटका मुळे पचनाची प्रक्रिया सुलभ होते. तसेच पोटातील गॅसेस कमी होतात. त्याच सोबत जर का आपण रोज जिऱ्याचे पाणी पिल्यास आपल्या शरीरात एन्झाइम (Enzyme) तयार होते. यामुळे चरबी ग्लुकोज आणि कार्बोहायड्रेट या सारखे घटक पचवण्यास मदत होते.

जिऱ्या मध्ये अँटिओसीडन्ट घटक असल्यामुळे शरीरातील जे काही वाईट घटक असतात त्यांना बाहेर काढण्याचे काम या जिऱ्याच्या पाण्या मुळे होते. शरीरातील वाईट घटक बाहेर पडल्यामुळे शरीरातील जवळपास सर्व अवयव व्यवस्थित कार्य करतात. रोज रात्री थोडे जिरे पाण्यात भिजत ठेवा आणि ते पाणी सकाळी उठल्यावर प्याचे आहे. यामुळे गॅसेस आणि असिडिटी पासून अराम मिळतो.

शरीराचे वजन वाढूनये म्हणून सुद्धा जिऱ्याचे पाणी मदत करते.

लोहाचे प्रमाणत हे जिऱ्याचा पाण्यात चांगल्या प्रमाणत असते. यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती हि चांगल्या प्रमाणात तयार होते. त्याच सोबत व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C यांचे प्रमाणत चागले असते. रोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आणि बऱ्याच संसर्गापासून आपले स्वंरक्षण होते.

जास्त वजन असलेल्या लोकांना रात्री झोप लवकर लागत नाही. अशा वेळी जर का रोज जिऱ्याचे पाणी पिल्यास झोप शांत लागू शकते. तसेच जिऱ्याच्या पाण्यात फायबर असते. यामुळे आपल्या शरीरातील कचरा बाहेर काढण्यास खुप उपयुक्त असते. वजन कमी करण्यास सुद्धा जरियाचे पाणी खुप लाभदायक आहे.

त्वचेसाठी लाभ दाय

बऱ्याच प्रमाणात जिऱ्या मध्ये व्हिट्यामिन असतात. ज्यामुळे शरीराची त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते. शरीराला लागणारे व्हिट्यामिन E चे प्रमाण चांगले असतात. जर का रोज जिऱ्याचे पाणी पिल्यास त्वचेवर तेज निर्माण होते. जिऱ्या मध्ये अँटी फ़ंगल घटक असतात त्यामुळे त्वचेवर कोणतेच इन्फेक्शन होत नाही.

केसा साठी सुद्धा जिरे खुप गुकारी आहे. बाजारात सहज रित्या काळे जिरे मिळतात त्यापासून जे तेल तयार होते. ते तेल जर का केसांना लावल्यास केस दाट व काळे राहण्यास मदत होते. जर का तुमच्या केसात कोंडा होत असेल तर जिऱ्याचे तेल आणि जिरे एकत्र करून थोडे गरम करून घ्या आणि कोमट तेलाने केसाची मालिश करा. यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

जिऱ्याचे पाणी कसे तयार करावे. या साठी एक ग्लास पाणी घ्या . त्यात दोन चमचे जिरे टाका. हे रात्री भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उकळून घेतल्यानंतर गाळून घ्या. आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी घ्याचे आहे. तसेच उरलेले जिरे चावून खावे.

हे पण वाचा:- या दोन राशीची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट