आज आपण गरम पाणी पिण्याचे फायदे आणि त्यात जर एक चमच्या तूप टाकून पिले तर अजून काय फायदे होतात या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील बरेच आजार कमी होतात. पण गरम पाणी कधी प्यावे आणि कधी पियू नये याबद्दल जर योग्य माहिती नसेल तर गरम पाणी पिण्याचे योग्य फायदे आपल्याला मिळत नाही.
जे व्यक्ती रोज सकाळी आणि रात्री गरम पाणी पितात त्यांच्या शरीरातून कफ बाहेर पडतो. त्याच सोबत ज्या व्यक्तीना त्वचेचा त्रास आहे अशा लोकांना सुदान गरम पाणी पिल्याने त्रास कमी होतो. चेहऱ्यवरील मुरूम आणि बारीक पुरळ येत असतील तर त्या पासून अराम मिळू शकतो. तसेच शरीरातील चरबी कमी करणे तसेच वजन कमी करणे यासाठी सुद्धा रोज कोमट पाणी प्यावे.
गरम पाणी पिण्याचे फायदे
नियमित कोमट पाणी पिल्यास आपल्या शरीरातील पचन प्रक्रिया चंगली होते तसेच नियमित पोट साफ होण्यास मदत होते. मिंत्रानो तुम्हला माहित असेल जर पोट साफ असेल तर आपल्या कोणतेच रोग लवकर होत नाही. तसेच नियमित गरम पाणी पिल्यास सांधे दुखी, गुढगे दुःखी, वात, कंबर दुःखी या पासून सुद्धा आराम मिळतो.
ज्या लोकांना भूक लागत नसेल. पोट गच्च झाल्यासारखे वाटत असते. अशा वेळी जेवण करायच्या आधी जवळपास दोन ते तीन तास आधी एक ग्लास गरम पाणी आणि त्यात लिंबू पिळून प्यावे यामुळे भूक लागते तसेच गच्च झलेले पोट सुद्धा रिकामे झाल्यासारखे वाटेल. जर का घसा दुखत असेल तर गरम पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या केल्यास घशाला अराम मिळतो तसेच सोबत गरम पाणी पिल्यास सर्दी सुद्धा कमी होते.
गरम पाणी आणि एक चमच्या शुद्ध तुपाचे फायदे
गरम पाणी पिण्याचे फायदे आपण जाणून घेतले पण जर का पण गरम पाण्यात एक चमच्या शुद्ध तूप टाकले तर त्याचे अजून चांगले फायदे मिळतात ते कोणते फायदे आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. गरम पाणी आणि एक चमच्या शुद्ध तूप यांचे मिश्रण रोज सकाळी करायचे आहे. ते सुद्धा फक्त सात दिवस.
बऱ्याच लोकांना पोट साफ न होण्याचं समस्या असते या मागे बरेच करणे आहेत. जसे कि रात्री जागरण करणे, योग्य वेळेस जेवण होत नसेल, जास्त प्रमाणत फास्ट फूड खाणे, ताण तणाव असेल यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही. त्याच सोबत पचन प्रक्रिया योग्य प्रकारे काम करत नसेल तर बद्धकोष्ठताचा सुद्धा त्रास होत असतो.
गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
आणि सर्वाना माहित आहे. जर का आपले पोट साफ होत असेल तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. वारंवार ढेकर येणे, चाऱ्यावर सुरकुत्या आल्यासारखे वाटणे. या सर्व समस्यांवर त्वरी अराम हवे असे तर रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात शुद्ध गाईचे एक चमच्या तूप टाकावे आणि सकाळी उपाशी पोटी प्यावे.
गरम पाणी पिताना ते कोमट करून प्यावे. तसेच ते एक एक घोट करून प्यावे
रोज कोमट पाणी आणि एक चमच्या तूप एकत्र करून पिल्याने शरीरातील वात आणि सर्दी कमी होतेच शिवाय हृदयातील ब्लॉकेज कमी होण्यास मदत होते. त्याच सोबत बुद्धीत वाढ होण्यास मदत होते. तुपात असेल सर्व महत्वाचे घटक आपल्या शरीराला फायदे देऊन जातात. त्यामुळे रोज सात दिवस कोमट पाणी आणि त्यात एक चमच्या शुद्ध गाईचे तूप टाकून प्या.
रोज सकाळी एक ग्लासच गरम पाणी प्यावे. त्या पेक्षा जास्त पिल्यास त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात. गरम पाणी हे कधीही जेवण झल्यावर एक ते दोन तासानी प्यावे.
हे पण वाचा:- आपले आयुष्य बदल्यासाठी झुंड या सिनेमातील तीन गोष्टी लक्षात ठेवा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




