पित्तनाशक सोलकढी या पद्धतीने बनवा. जाणून घ्या सोलकढी पिण्याचे फायदे.
फूड

पित्तनाशक सोलकढी या पद्धतीने बनवा. जाणून घ्या सोलकढी पिण्याचे फायदे.

सोलकढी बनवण्याची पद्धत आणि सोलकढी पिण्याचे फायदे या बद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण बाहेर फिरायला गेलो कि त्या ठिकणी सोलकढी दिसते आणि ती आपण लगेच पितो. तसे पहिला गेल्यास सोलकढी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. आणि घरी सुद्धा आपण सहज रित्या करू शकतो. बऱ्याच लोकांना सोलकढी बनवण्याची पद्धत माहित नसते. त्यांच्या साठी हा आजचा लेख लिहिला आहे.

सोलकढी बनवण्याची कृती आणि सोलकढीचे फायदे

सोलकढी बनवण्याची पद्धत, सोलकढी या पद्धतीने बनवा, सोलकढी पिण्याचे फायदे

खरे पहिला गेले तर सोलकढी हा पदार्थ कोकणात जास्त प्रमाणत केला जातो. माशाची मेजवानी असेल त्या दिवशी शक्यतो सोलकढी केली जाते. कारण सोलकढी हे जेवण पचवण्यासाठी खुप चंगली असते. तसेच इतर हि त्याचे खूप फायदे आहेत. तर सोलकढी बनवायची पद्धत आणि साहित्य कोण कोणते लागणार आहे त्या बद्दल जाणून घेऊ.

सोलकढी बनवण्याची पद्धत (Method of Making Solkadhi)

पाचक आणि रुचकर सोलकढी कशी बनवायची ते जाणून घेऊन या साठी आपल्या काही साहित्य लागणार आहे. ओला नारळ (अर्धा घेतला तरी चालेल), दोन हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या तीन ते चार, कोकम आमसूल पंधरा ते वीस, साखर दोन चमचे (चवी नुसार), मीठ (चवीनुसार) पाणी (अर्धा ते पाऊण लिटर ) हे सर्व साहित्य घेल्यानंतर कशा प्रकारे मिक्स करायचे हे जाणून घेऊ.

सोलकढी बनवण्याची पद्धत, Method of making Solkadhi

कृती हि खुप सोपी आहे सोलकढी बनव्याची. कोकम आमसूल एक तास पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत. एक मिक्सरचे भांडे घ्या या भांड्यात सर्व साहित्य एकत्र करायचे आहे. ओले नारळाचे फोडी करून घ्या ते त्यात टाका, दोन ते तीन अद्रकाच्या फोडी त्यात टाका, दोन मिरच्या (जर का मिरच्या जास्त तिखट असतील तर एक घेतली तरी चालेल), लसणाच्या तीन ते चार फखळ्या, बिट दोन फोडी (छोट्या ) सोलकढीला रंग येण्यासाठी बिटचा वापर करायचा आहे. दोन चमचे साखर टाकायची आहे. आणि एक ग्लास पाणी

making Solkadhi, सोलकढी बनवण्याची पद्धत

वरील सर्व गोष्टी बारीक करून घ्याच्या आहेत मिक्सर मधू. पूर्ण बारीक झाल्यानंतर एक गाळणी मधून सर्व गाळून घ्या. त्यानंतर जो काही चोथा रहाणार आहे. तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा बारीक करून घ्याचे आहे. असे दोन वेळेस करून घ्या. त्या नंतर जी सोलकढी आपली तयार झाली आहे ती पुन्हा एका बारीक गाळणीने गाळून घ्या. त्यात आपण एक तासाआधी जे कोकम आमसूल भिजत ठेवले आहे ते गाळणीच्या साह्याने गाळून त्या सोलकढीत पाणी मिक्स करा. आता आपली सोलकढी पिण्यासाठी तयार झाली आहे.

सोलकढी पिण्याचे फायदे (Benefits of Drinking Solkadhi)

Make biliary solkadhi by this method

सोलकढी पिण्याचे फायदे खुप आहेत. सोलकढी जर का पण जेवण झाल्यावर पिल्यास अन्न पचन होण्यास मदत होते. त्याच बरोबर पित्तनाशकसुद्धा आहे. खासकरून उन्हळ्यात सोलकढी पिल्यास उन्हाचा त्रास सुद्धा होत नाही. नॉनव्हेज जेवण चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी सुद्धा सोलकढी पिणे चांगले असते. त्याच बरोबर सोलकढी पिण्याचे इतर हि खुप फायदे आहेत.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट