आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे थोडं कठीण होते. आपल्या दिवसाची सुरवात जर हेल्दी खाण्याने होत नसेल तर आपला आरोग्याला धोक्याचे आहे . सकाळी खूप वेळा लोक कमी वेळात बनणारा पदार्थ म्हणलं कि लोक पोहे बनवतात आणि त्याच पोहे खाण्याचे फायदे तुमाला आम्ही सांगणार आहोत

कार्बोहैड्रेट युक्त
पोह्यात कार्बोहैड्रेट च प्रमाण ७६.९% असते त्यामुळे आपल्याला लागणारी ऊर्जा ह्यातून मिळते जे कि शरीराला गरजेची आहे.
पोषण मिळते
पोहे बनवत असताना तुमि त्यामाडे शेंगदाणे किंवा ड्राय फ्रुटस सोबत कांद्याचा वापर केला जातो ज्याचा सेवनाने तुमाला पोषण मिळते .

लठ्ठपणा कमी करण्यासाठी
जर तुम्हाला वजन कमी करू इच्छित असाल तर ब्रेड बटर खाणे सोडून द्या आणि पोहे खाणे सुरु करा तुम्हाला ह्यातून ऊर्जा हि मिळते आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत होते आणि पोषक घटकांची कमतरता हि भरून काढली जाते.
पोट साफ राहण्यास मदत
पोह्यामदे फायबर असतात जे पचायला खूप सोपे असतात, तुम्ही जर बाहेरचे पदार्थ सेवन करत असचाल तर ते पचण्यास खूप वेळ लागतो पण जर तुम्ही पोहे खात असाल तर ते पचण्यासाठी अत्यंत चांगले असून दीर्घकाळ ऊर्जा हि देतात.पोह्याचा सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.

लोहाचा चांगला स्रोत
पोहे खाणे शरीरात लोहाच्या कमतरतेसाठी फायदेशीर आहे. पोहेमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतात . गर्भवती स्त्रियांनी आणि लहान मुलांनी ते खावे कारण यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.




