लाईफस्टाईल

दैनंदिन जीवनातील कापराचे फायदे घ्य्या जाणून.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजचा लेखाचा टॉपिक खूप विशेष आहे. आज आपण कापराचे आपल्या दैनंदिन जीवनात काय फायदेच आहेत ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खरंच कापराचे खूप मस्त उपयोग आहेत पण त्याच्यासाठी आपण कोणता कापूर वापरायचा ते पण महत्वाचे आहे.

आपण नेहमी देवासाठी जे उपयोग करतो, कापराच्या वड्या किंवा ज्या टॅब्लेट्स असतात त्या आपण न घेता आपण भीमसेनी कापूर घ्याचा आहे, हा भीमसेनी कापूर खणायच्या पदार्थांमध्ये देखील हा वापरला जातो. तुम्हाला माहिती असेल कि हा कापूर तिरुपती च्या प्रसादात टाकलेला जातो. तर आपण हाच कापूर घ्याचा आहे हा आपल्याला कोणत्याही दुकानात उपलब्ध होतो. चला तर जाणून घेऊयात कापराचे उपयोग.

भीमसेनी कापराचे फायदे :

घरातील वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी:
आपण सकाळी जशी देवाची पूजा करतो तश्याच प्रमाणे आपण हा भीमसेनी कापूर घ्याचा आहे व तो आपण आजकाल एलेकट्रीक कापूरदाणी मिळते त्यात आपण तो टाकायचा आहे, ह्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व ताजेतवाने वाटते. घरात एक प्रकराची सकरात्मक ऊर्जा जाणवते.

त्वचेला उजळण्यासाठी व स्किन प्रॉब्लेम्सठी:
कधी कधी आपल्या चेहऱ्याच्या स्किन ला खाज येते किंवा काही चेहऱ्यावर पिंपल्स किंवा आणखी काही चेहऱ्याच्या समस्या असतील तर आपण एक फेस पॅक बनवायचा आहे, फेस पॅक साठी आपण दोन चमचे मसुरी डाळीचे पीठ घ्याचे आहे व त्यानंतर आपण त्यात थोडासा असा कापूर बारीक वाटून अगदी एक चीमुठ्भर असा घेऊन त्यात आपण मिक्स करायचा आहे.

त्यानंतर आपण त्यात थोडे एलोवेरा जेल व नंतर आपण त्यात थोडेसे गुलाब जल देखील त्यात टाकायचे आहे, तर असा फेस पॅक आपण बनवून आपण चेहऱ्यावर लावायचा आणि अगदी थोडासा वेळ ठेवून पूर्ण सूकूनही द्याचा नाही अगदी थोडा वेळ ठेवून आपण त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्याचा आहे. हा पॅक आपण आठवड्यातून एकदा दोनदा करा तुमची सर्व स्किन प्रॉब्लेम्स दूर होतील. चेहरा उजाळ बनेल. त्वचा देखील तजेलदार व टवटवीत बनते.

हे पण वाचा :-  आज मध्यरात्रीपासून, सोमवारी पासून ह्या लोंकांच्या होतील अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण.

कपड्यांना सुवासिक ठेवण्यासाठी कापराच्या पुरचुंडी करून ठेवा:
कापराच्या पुरचुंडी करून आपण त्या आपल्या ठेवणीचे कपडे असतात किंवा काही अंथरून पांगरून असतात त्यात आपण ह्या ठेवून द्याच्या आहेत. पावसाळ्यात कपड्याना येणाऱ्या कुजत वसापासून हे दुर्गंधी मुक्त करते. कपाटातील सर्व कपड्यांना अगदी नैसर्गिक सुवास देतो हा भीमसेनी कापूर म्हणून अश्या छोट्या छोट्या कापडाच्या पुरचुंडीत आपण हा कापूर ठेवून आपल्या कपाटात ठेवणीच्या कपड्यात ह्या पुरचुंड्या आपण ठेवू शकतो.

केसातील कोंढा घालवण्यासाठी:
आपल्या केसात जर कोंढा झाला असेल किंवा आपला स्कॅल्प खराब झालेला असेल तर त्यासाठी आपण खोबऱ्याचा तेलात आपण छोटासा कापराचा तुकडा टाकून ते तेल थोडेसे गरम करून घ्या. व असे तेल आपण आपल्या केसांना आपल्या स्कॅल्प ला लावा ह्यामुळे आपल्या केसातील संपूर्ण कोंढा निघून जाईल. आपली केस देखील चांगली राहतात. डोक्याची जी काही खाज असेल ती खाज दूर होईल.

सांधेदुखी, गुडघेदुखी ह्यांच्यापासून मुक्तता मिळेल:
तिळाचे तेल घेऊन त्यात आपण एक छोटासा कापूर टाकून द्यावा बहुतेक वेळी लोकांना गुडघेदुकीची समस्या असते तर असे कापूर टाकलेले तिळाचे तेल गरम करून घेऊन ते आपण आपल्या गुडघ्यांना लावा तुमची गुढघेदुखी अगदी काही दिवसांतच बरी होईल. सांधेदुखी, जॉईंट पेन असेल तर ह्या सर्वांवर आपण आपण हा उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तर मित्रांनो हे होते भीमसेनी कापराचे काही उपाय तुमहाला ह्यातला कोणता उपाय आवडला ते आम्हाला नक्की कळवा तसेच हे फायदे तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेयर करा,धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.