फूड

सीताफळ खाण्याऱ्यांनो आजचा लेख अवश्य वाचा.

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज आपण सीताफळाबद्दल काही विशेष माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. सीताफळ हे चवीला चांगले असून आरोग्यदायी ह्याचे अनेक फायदे आहेत. मित्रांनो सीताफळ हे आरोग्यदायी आहे बालवर्धक आहे, पित्तनाशक आहे. पौष्टिक आहे, वातदोष घालवणारे आहे, आणि सर्वात मह्त्वाचे आपल्या हृदयासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात ह्याचे फायदे.

आपल्या केसांसाठी, सीताफळ खाल्याने आपले केस काळेभोर तसेच घनदाट होतात. आज आपण अनेकजण पाहतो कि केसांच्या गळती किंवा इतर काही समस्या असतील त्यामुळे अनेकजण त्रस्त आहेत. केस खूप गळतात. अकाली टक्कल पडते, अश्या समस्या जर तुम्हाला पण जाणवत असतील तर मित्रांनो आपण सीताफळ हे आपण त्या त्या मोसमांमध्ये नक्की खायला हवे. सीताफळ खाल्याने आपले केस गळतीचे प्रमाण हे कमी येते. जे लोक त्या त्या सीजन नुसार सीताफळ खातात. त्यांना केसगळतीची अजिबात त्रास होत नाही.

जर तुम्हाला टक्कलच पडले असेल तर आयुर्वेदात सांगितले आहे कि ह्या सीताफळाच्या ज्या बिया असतात त्या बिया ह्या आपण जर टक्कल पडलेल्या जागी जर उगाळून लावल्या तर नवीन केससुद्धा उगवतात. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना पिंपल्स चा त्रास असतो. अनेक जणांना फोड येतात मुरूम येतात. तर ह्या सीताफळाच्या पानांचा जर आपण लेप करून जर का आपण लावला तर ह्या फोडांची समस्या दूर होते. तर हा देखील सीताफळांच्या पानांचा एक खूप छान फायदा आहे.

मित्रांनो सीताफळ खाल्याने आपले हृद्य स्वस्थ राहते निरोगी राहते, आपल्या हृद्याच्या आरोग्यसाठी सीताफळ फार उपयोगी आहे. ज्यांना विशेष करून हाय ब्लड प्रेशर चा म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी तर सीताफळ नक्की खावे कारण ह्यात अँटिऑक्सिडेंट्स चे प्रमाण जास्त असते, तसेच पोटॅशिअम सुद्धा जास्त आहेत, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यसाठी सुद्धा चांगले आहे.

मित्रांनो ज्यांना वारंवार पित्त जळजळ होते त्यांनी सीताफळ अवश्य खावे. कारण अम्ल पित्त असूद्यात, अपचन तसेच जर छातीत किंवा शरीरात जर तुम्हाला उष्णता जाणवत असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी सीताफळ खाणे हे खूप उत्तम मानले जाते. बऱ्याच जणांना आजारपणानंतर शरीर अशक्त बनते तसेच काम करताना वारंवार थकवा येतो, थोडक्यात अशक्तपणा जर असेल तर हा अशक्तपणा दूर करणारे हे फळ आहे.

मित्रांनो जर तुमच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, छातीत घाबरल्यासारखे असेल, दडपण आल्यासारखे असेल तर तेव्हा लक्षात घ्या कि तुमच्या शरीराच्या मांस पेशी ह्या दुर्बल झाल्या आहेत, त्यावेळी ह्या मांस पेशी बळकट बनवायच्या असतील तर हे सीताफळ हे खूप चांगले आहे.

ह्यामुळे तुमचे छातीतील धडधड होणे, छातीतील ठोके वाढलेले कमी होतात ह्या सीताफळाच्या सेवनाने. तर अश्या पद्दतीने मित्रांनो हे सीताफळ हे बहुगुणी आहे. म्हणूनच तुम्ही देखील हे सीताफळ त्या त्या सीजन मध्ये नक्की खा व त्याचे फायदे नक्की उठवा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट