फूड

सीताफळ आहे आरोग्यासाठी अतिशय उत्तम, तसेच ते खरेदी करताना घ्या हि काळजी

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, भारतातील ग्रामीण भागातून सर्वाधिक निर्यात होणारे फळ ते म्हणजे सीताफळ हे एक आहे. हे फळ अतिशय मधुर, रसाळ व पौष्टिक असते. भारतात खूप प्राचीन काळापासून हे फळ प्रसिद्ध आहे. आपल्यालपैकी कोणीही असे नसेल कि ज्याने सीताफळाचा स्वाद घेतला नाही.

मला तर आमच्या लहानपणची गोष्ट आठवली आम्ही लहानपणी आमच्या मामाच्या गावाला जायचो तेव्हा तिथे आम्ही सीताफळ खाण्याची स्पर्धा करायचो. आजच्या लेखात आपण ह्या सीताफळाचे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जेव्हा श्री राम प्रभू आणि सीता माता जेव्हा वनात राहत होते तेव्हा सीता मातेला हे फळ अतिशय प्रिय होते तेव्हापासून ह्या फळाला सीताफळ असे म्हणतात. असे आपल्या धार्मिक ग्रंथात सांगितले जाते. तर वनस्पतिशास्त्रानुसार हे फळ थंडीच्या दिवसात येणारे व थंड हवामान असलेल्या वेळी हे फळ येणारे थंड प्रवृत्तीचे फळ आहे. शीत प्रवृत्तीचे असल्याने ह्याला सीताफळ असे नाव देण्यात आले. सीताफळाला शरीफा किंवा कस्टर्ड अँपल देखील म्हणतात. ह्यात भरपूर प्रमाणात फायबर व खजिने असतात.

सीताफळ खाण्याचे फायदे (custard apple benefits):

सीताफळात अँटिऑक्सिडेंट्स चे प्रमाण जास्त असते. तसेच ह्यात व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन सि, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व कॉपर एवढे तत्व आढळतात. ह्यामधील कॅरोटोनॉईड नावाचे अँटिऑक्सिडेंट हेलथी आय व्हिजन म्हणजेच आपल्या डोळ्यांच्या तीक्ष्ण व दूरदृष्टी प्रदान करते. त्याचबरोबर ह्यातील व्हिटॅमिन सि मुळे त्वचेचा पोच सुधारतो. आणि इम्युनिटी वाढण्यास मदत होते. ह्यातील लोहामुळे रक्ताची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. सीताफळात बी ६ ज्याला पॅरॉडॉक्सिन असे म्हण्टले जाते हे भरपूर प्रमाणात असल्याने. ह्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते.

व्हिटॅमिन बी ६ च्या कमतरतेमुळे डिप्रेशन येण्याचे चान्स असतात आणि त्यावर हे सीताफळ खूप चांगल्या प्रकारे काम करते. गरोदर स्त्रियांसाठी हे सीताफळ खूपच फायद्याचे ठरते. हे आई व मुलाच्या पोषण देतेच तसेच गरोदर स्त्रीचा मूड चांगला ठेवते. सीताफळ हे हृदयरोगावर तसेच, हाडांच्या, दातांच्या समस्यांवर देखील अगदी एखाद्या टॉनिक सारखे काम करते. थोडक्यात म्हणायचे झाले तर सीताफळामुळे मानसिक आणि शाररिक दोन्ही देखील आरोग्य सुधारतात.

सीताफळ खरेदी करताना नेमके काय पाहून खरेदी करावे?

सीताफळ नेहमी मोठ्या डोळ्यांचे लाल पांढऱ्या आरेचे खरेदी करावे असे सीताफळ चवदार असते. शुगर पेशन्ट साठी मर्यदित व जर न पिकलेले सीताफळ खावे.

सीताफळाचे तोटे (custard apple):

सीताफळाचे अति सेवन देखील धोक्याचे आहे, कारण ह्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे आपल्याला जुलाब, गॅस, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. सीताफळ मधील आयर्न चे प्रमाण जास्त असते ह्याचे अतिसेवन केल्याने त्याचे शरीरातील आयर्न चे प्रमाण वाढते त्यामुळे पोटात मळमळ होते. सीताफळ हे थंड प्रवृत्तीचे असल्याने ज्यांना सर्दी कफ ह्याचा त्रास होतो त्यांनी सीताफळ खाणे टाळावे.

तर अश्या पद्दतीने आपण ह्याचे योग्य प्रमाणात सेवन करून त्याचा आपण लाभ घ्यावा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट