फूड

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो एक काळ असा होता कि प्रेत्येकाच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी अशी धान्ये अवश्य असायची परंतु आजकाल ह्या सर्वांची जागा मात्र गव्हाणे घेतली आहे. मित्रांनो बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि आता जो कोरोनाचा जो वाढता प्रभाव आहे अश्या काळात तर शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे सेवन आपण अवश्य करावे.

हि बाजरी who म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्य केलेलं आहे कि बाजरीची भाकरी खाल्यास आपल्या शरीरात अँटीबॉडीस मोठया प्रमाणात निर्माण होतात. उष्णता उत्पन्न होते आणि कोरोनापासून आपला बचाव होतो. मात्र ह्याचा अर्थ असा नाही कि बाजरीची भाकरी खाचाल आणि बाहेर बिंधास्त फिराल. शासनाने जी नियमावली घालून दिलेली आहे तिचा आपण अवश्य पालन करा आता नवीन संक्रमणाची लाट देखील येत आहे त्यापासून सावधानीने सर्व कामे करा.

मित्रांनो बाजरीच्या भाकीरत फायबर्स १७ टक्के, कर्बोदके २५ टक्के, उष्मांक ७५६ किलोकॅलोरी इतका आहे, जीवनसत्व बी ६ जीवनसत्त्व इ ह्या सारखी महत्वाची जीवनसत्वे ह्या बाजरीत आहेत. कॅलसियम, लोह, मँग्नेसीयम ह्यात मुबलक प्रमाणात आहेत. म्हणूनच बाजरी हि आपल्या आहारात अगदी उत्तम ठरते.

बाजरीच्या भाकरीचे आठवड्यातून २ किंवा ३ वेळा जरी भाकरी खाल्या तर आपले हृदयाचे स्वास्थ्य देखील चांगले राहते कारण ह्या बाजरीच्या भाकरीत पोटॅशिअम असतात जे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा मुबलक प्रमाणात ठेवण्यास मदत करतात. बाजरीमध्ये जे फायबर्स आहेत ते आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवतात. मित्रांनो जर आपली हाडे आपल्याला मजबूत ठेवायची असतील, तसेच मधुमेहापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण बाजरीची भाकरी आपल्या आहारात नक्की आना.

जर आपल्याला आम्ल्पित्ताचा त्रास असेल तर ह्यावर बाजरी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो बाजरीचा घाटा तयार केला जातो. ज्यांना वारंवार सर्दी होते. अश्या लोकांनी हा बाजरीचा घाटा अवश्य तयार करा त्यासाठी आपल्याला गरम पाणी तयार करून त्यात आपल्याला बाजरीचे पीठ टाकायचे आहे. त्यात आपण थोडासा गूळ व काळे मिरे टाकायचे आहे. १० मिनटे हे मिश्रण आपण उकळवायचे आहे त्यानंतर आपला घाटा तयार होतो.

हे पण वाचा :-  पित्तनाशक सोलकढी बनवण्याची कृती आणि सोलकढी पिण्याचे फायदे.

हा बरजिरीचा घाटा तयार करून आपण चहा सारखा पिला तर आपल्याला सर्दी पडसे येत नाही. जर आपण बाजरीचे पीठ तव्यावर टाकून त्याचा धूर घेतला तर त्यामुळे आपला सर्दीचा त्रास आहे तो खूप लवकर बरा होतो. ज्यांचे पोट वारंवार बिघडते, ज्यांना गॅसेस चे त्रास आहेत अश्यानी बाजरीचे सेवन अवश्य करा कारण ह्यात जे फायबर्स असतात ते आपले पचनक्रिया चांगली बनवतात व सोबतच आपले पोटाचे विकार देखील बंद होतात. आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून चांगले कोलेस्ट्रॉल बनवतात इतका जास्त बाजरीचे फायदे आहेत.

ज्यांना केस गळतीची समस्या आहे त्यांनीदेखील ह्या बाजरीच्या भाकरीचा अवश्य समावेश करा. ह्या बाजरीत भरपूर प्रोटिन्स आहेत जी केसांना मजबूत बनवतात. केस जाड आणि चमकदार बनतात. ज्यांना दमा किंवा श्वसनाचे विकार आहेत त्यांनी हा दमा दूर करण्यासाठी ह्याचे सेवन अवश्य करावे.

मात्र जास्त प्रमाणात बाजरी खाणे देखील तितकेच अडचणीचे आहे ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी ह्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.