नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तूप हा असा एक पदार्थ आहे जो कि प्रेत्येकाच्या घरात सापडतेच. तूप किंवा लोणी हे साधारणपणे लोक त्याला फॅटी आहे असे समजले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे फक्त एक चमचा तूप खाण्याचे फायदे खूप जास्त आहेत. वरण भात तूप पोळी किंवा खिचडी ह्या सर्व वस्तू आपण तुपाशिवाई खाणे ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
खूप लोकांना वाटते कि तूप खाल्याने वजन वाढते किंवा चरबी वाढते. उलट दररोज एक चमचा तूप खाल्याने आपल्याला खूप फायदा होतो. सकाळी एकच चमचा तूप खाल्याने काय फायदे आहे ते सुरवातीला जाणून घेऊयात. तुपात जीवनसत्व ए, डी, ई, के असतात जे आपल्या आतड्यांचे आरोग्य वाढवण्यास मदत करते. हे बद्धकोष्टकेसारख्या अनेक आजारांपासून दूर ठेवते. तूप शरीराला निरोगी बनवायला मदत करते. हे आपल्या शरीरातील हानिकारक गोष्टी बाहेर काढते आणि आपल्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्यास मदत करते.
तूप खाण्याचे फायदे
बाजारातील एखाद्या रिफाईंड तेलापेक्षा तूप हे कधीपण चांगलेच असते. एका सर्वेनुसार तूप हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कॅलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. ज्यांना सांधेदुखी किंवा हाडाच्या समस्या आहेत ते आपल्या सकाळची सुरवात तुपाने करू शकता. तूप तुमच्या सांध्यांना वंगण घालते आणि ह्यामुळे आपली हादेदुखी दूर होते.
आपल्या शरीराला योग्य रित्या कार्यरत राहण्यासाठी काही जीवनसत्व आणि पोषणतत्त्व आवश्यक आहेत. तूप हे पोषक तत्वे आणि जीवनसत्वांनी पोषक आहेत, त्यामुळे तूप हे आपल्या शरीराचे पॉवर हाऊस बनून जाते. सकाळी एक चमचाभर तूप खाल्याने आपल्या शरीराला हे सर्व पोषक घटक मिळतात. तुपात चरबी कमी असते म्हणून हे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते. तुपात पचन क्रिया मजबूत करण्याची ताकद असते. तुपामध्ये अमिनो ऍसिडस् असतात जे कि चरबी कमी करण्यास मदत करतात.
रिकाम्या पोटी तूप खाल्याने आपल्या मेंदूच्या पेशी ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे मेमरी व शिकण्याची क्षमता देखील वाढते. आपल्याला केसगळती किंवा केस पातळ यासारख्या समस्या असतात त्यांनी तर असे रिकाम्या पोटी सेवन करायलाच हवे. त्यामुळे केस मजबूत होतात व केसांची चमक देखील वाढते. तुम्हाला कोणत्याही प्रकराची ऍलर्जी असेल तर त्यावर आपण तुपाचे काही थेंब आपल्या नाकात टाकल्याने आपली ऍलर्जी कमी होते. एवढेच नाही तर तुमचे अनेक आजार देखील ह्या तुपामुळे बरे होतात.
तूप हे नियमित नाकातून सोडल्यास आपल्याला मायग्रेन सारख्या आजारांपासून आपल्याला राहत मिळते. गरोदरपणात तर महिलांना तुपाचे अनेक फायदे आहेत. गरोदरपणात सहाव्या महिन्यात गाईचे तूप हे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. तुपामध्ये असणारे व्हिटॅमिन डी हे थायरॉईड च्या ग्रंथी देखील ठीक करतात जे गरोदरपणात फायदेशीर आहे.
डोळ्यांसाठी देखील तूप खूप फायदेशीर असते, तुपामधील व्हिटॅमिन ए जे आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. असे अनेक फायदे वाचल्यानंतर आपण देखील तूप खायला आजपासूनच सुरवात करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




