घरगुती उपाय

जाणून ह्या गुळवेलाचे असंख्य फायदे.

. नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आज अमृता म्हणजेच गुळवेलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गुळवेल हे नाव आजकाल इतके चर्चित आहे, परंतु ह्या आधी लोकांनी ह्याबद्दल ऐकले देखील नसावे त्याच गुळवेलबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. गुळवेल आपल्याला अगदी रस्त्याच्या कडेने छोट्यमोठ्या झाडांमाह्ये आढळून येते.

मित्रांनो अगदी गाव सोडून आजकाल शहरांमध्ये गेले आहेत ते लोक देखील आज ह्या गुळवेलबद्दल चौकशी करत आहेत, कारण ह्याचे महत्वच एवढे वाढले आहे. मित्रांनो ह्या गुळवेलचा जो काढा आहे तो घेण्यासाठी सांगितला जातो पण त्याची पद्धतशीर माहिती आपण घेणार आहोत. ज्या लोकांना पोहे खाल्यानंतर त्रास होतो त्यांनी तर गुळवेलचा काढा नक्की घ्या त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

बऱ्याच लोकांना ह्या वनस्पतींबद्दल माहिती नाही, गुळवेलची वनस्पती ओळखायची कशी तर त्याची जी पाने असतात ती हृदयाच्या आकाराची असतात. एखाद्याला जर ताप येत असेल तर हे कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे पण ते तुमच्या शरीर प्रकृतीनुसार कसे घ्याचे हे तुम्ही वैद्याच्या साह्यानेच घेतले पाहिजे. बऱ्याच लोकांना वाताचे आजार असतात. जर ह्याच्यावर तोडगा म्हणून गुळवेलासोबत सुंठ टाकून त्याचा काढा घेतला जातो. तो खूप फायदेशीर ठरतो, आपल्या अंगात जर उष्णता वाढली असेल तर ह्याचा काढ्याने आपल्याला फायदा होतो.

आजच्या अनेक आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये ह्या गुळवेलचा वापर केला जातो. त्याचे महत्वाचं एवढे आहे. आयुर्वेदातील कामदुधा ह्या गोळीत देखील ह्याचा प्रामुख्याने वापर केला जातो, जर खूप ताप येत असेल तर बऱ्याच गोष्टींसाठी ह्याचा वापर होतो. मित्रांनो आज गुळवेलाच नाव इतकं प्रसिद्ध झालं आहे कि तो आता मिल्ने देखील काठीन झाला आहे. हा शक्यतो आंबा, लिंब, करंज ह्या झाडावरची घ्यावी शक्यतो निंबावरची जर घेतली तर त्याच्यात चान्गल्या प्रकारचे सत्व असते.

त्याची साल हि करड्या रंगाची असते मधली साल हि हिरवी व गुळगुळीत असते. जर वेळेला ताजी गुळवेल वापरली तर त्याचा फायदा खूप फायदेशीर ठरतो. गुळवेलची पेस्ट करून जर ती आपण त्वचेवर लावली तर त्याचा देखील फायदा आपल्याला होतो. सांधेदुखीसाठी तर ह्याचा लेप करून लावल्याने खूप फरक पडतो. गुळवेलाच्या पानांची भाजी देखील आपण करून खाऊ शकता त्याचे फायदे खूप आहेत आपली चयापचन क्रिया चांगली करते.

साथीच्या आजारात तर ह्या गुळवेलचा वापर तर खूप होतो. मधुमेहात सुद्धा ह्याचा वापर फार होतो. गुळवेलासोबत घेणारा पदार्थ बदलला कि त्याचे परिणाम बदलतात. पित्त कमी करण्यासाठी आपण गुळवेलासोबत खडीसाखर घेऊ शकता. कफ कमी करण्यासाठी ती जर मधासोबत घ्यावी त्यामुळे आपल्याला लगेच फायदा पडतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील हा गुळवेल खूप फायदेशीर आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट