लाईफस्टाईल

आज भाऊबीज जाणून घ्या शुभ मुहूर्त, बहिनेने करा हा एक उपाय भाऊ सुखी संपन्न राहील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दिवाळीतील पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज ह्या वर्षी ६ नोव्हेंबर शनिवारचा दिवशी अली आहे म्हणजे आजच आहे, रक्षाबंधनाला जसे बहीण भावाच्या नात्याचा पवित्र उत्सव मानला जातो अगदी त्याच प्रकारे हि भाऊबीज सुद्धा पवित्र नाते दर्शवते.

भाऊबीजेला ज्या स्त्र्यियांचा विवाह झालेला असतो त्या आपल्या भावाला आपल्या घरी बोलवून ओवाळतात टिळा लावतात व यमदेवतेकडे प्रार्थना करतात कि आपल्या भावाचे अकाल मृत्यूपासून यमदेवतेपासून रक्षण करावे. आपल्या भावाला सुखसमृद्धी लाभावी.

मित्रांनो हा उत्सव साजरा केला जातो तो केवळ विवाहित महिलाच नव्हे तर ज्या अविवाहित मुली आहेत त्यासुद्धा हा उत्सव अगदी वात्सल्याने साजरा करतात. ह्यावर्षीच्या भाऊबीजेचा मुहूर्त आहे ते आपण जाणून घेउयात त्यापूर्वी एक कथा आहे ती जाणून घेउयात.

सूर्याची दोन मुले आहेत यम आणि यमी अर्थातच हि दोन बहीण भाऊ आहेत आणि यमीचा विवाह झाल्यानंतर तिची खूप इच्छा होती कि तिझ्या भावाने म्हणजेच यमाने तिच्या घरी यावे व तिच्या बाहिनीची भेट घ्यावी परंतु यमदेव होते त्यांना माहिती होते कि आपण असे बहिणीच्या घरी जाऊ शकत नाही कारण ते मृत्यूचे देव आहेत. आपल्या बहिणीच्या घरी काही तरी अमंगल घडेल ह्या भीतीने ते जात नसत.

परंतु यमीने एकदा खूप आग्रह केल्यानंतर एकदा त्यांना जावे लागले. आपला भाऊ घरी आलेला आहे हे पाहून यमीला खूप आनंद झाला तिने भावाचे औक्षण केले तिने भावाला ओवाळले आनि भावाने विचारले कि तुला भेट म्हणून काय देऊ.

तेव्हा यमीने सांगितले कि हे यम देवा तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन घरी आला तर आजपासून ह्या दिवशी जो पण भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण अरुण घेईल व तिथे भोजन करेल अश्या बहीण भावाला आपण अकाल मृत्यू पासून वाचवा.

यमदेवतेने देखिल आपल्या लाडक्या बहिणीची हि मागणी पूर्ण केली. आणि तेव्हापासूनच आपण भाऊबीजेचा जो उत्सव आहे तो साजरा करतो. मित्रांनो ह्या दिवशी आपण काही गोष्टींचे पालन अवश्य करा. जसे कि बहिणीने केलेल्या अन्नाचा अपमान अनादर करू नका. हाय दिवशी बहीण भावाने आपसात भांडू नका.

बहिनेने जी काही भेट दिलेली आहे त्या भेटीचा आदर करा. ती प्रेमाणे स्वीकार कारवी. ह्या दिवशी महिलांनी यमदेवतेच्या नावानी चारमुखी दिवा अवश्य प्रज्वलित करून तो आपल्या उंबरठयावर ठेवा असे केल्याने आपल्या भावाच्या जीवनातील अडथळे दूर होतील व आपला भाऊ प्रगती करू लागेल.

जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला टिळा लावणार आहेत त्यापूर्वी तुम्ही विष्णूंना आदी टिळा लावा आणि मगच आपल्या भावाला टिळा लावा असे केल्याने आपला भाऊ जर खूप संघर्षमय जीवन व्यतीथ करत असेल किंवा खूप संकटे असतील जीवनात तर ती संकटे वविष्णूंच्या आशीर्वादाने कमी होतील व आपला भाऊ प्रगती करेल.

ह्या वर्षी शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी १:१० मिनीटांनी सुरु होऊन दुपारी ३:२१ मिनटे असा हा शुभ काळ आहे. ह्या वेळात बहीण भाऊ भाऊबीज साजरी करू शकतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट