वास्तू शास्त्र

घरातील पाण्याचा बोर ह्या दिशेला असेल तर घरात येते गरिबी.

वास्तूशास्त्रानुसार बोरवेल म्हणजेच बोर जर चुकीच्या दिशेला असेल तर घरातील कर्त्या व्यक्तीला अनेक सस्यांचा त्रास सहन करावा लागतो. कर्त्या व्यक्ती म्हणजे घरात पैसे कमवणारी व्यक्ती मग तो व्यवसाय करत असूद्यात किंवा नोकरी. तर अश्या कर्त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात जर बोर चुकीच्या दिशेला असेल तर. मित्रांनो सोबतच ह्यामुळे घरातील आर्थिक परस्थितीवर देखील ह्याचा परिणाम होतो. घरातील लोक मानसिक आजारांना बळी पडतात, म्हणूनच जलतत्व असणारे हे बोर योग्य त्या दिशेला असणे फार महत्वाचे असते.

एक अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुम्ही घरात बोर घेतली असेल किंवा तुम्ही एखादा फ्लॅट घेतला असेल किंवा जमीन घेतली असेल तर त्याची सर्वप्रथम भूमिपूजन करणे फार मह्त्वाचे असते ते केल्याशिवाय जर तुम्ही बोर घेणार असाल तर त्यांनी देखील घरात हे सर्व प्रॉब्लेम्स उध्दभवतात. मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कि वास्तुशास्त्रात बोर हा घरात कुठे असावा व तो कोणत्या दिशेला नसावा.

सर्वप्रथम दिशा म्हणजे ब्रह्मस्थान ह्या ठिकाणी तुम्ही चुकूनही बोर घेऊ नका ब्र्हमस्थान म्हणजे घराचे केंद्रबिंदू घरातील सेंटर हे नसावे. घरातील अश्या दिशेला असणारा बोर हा घरात पैस्याच्या समस्या निर्माण करतो. जर तुमच्या देखील घरात जर असे बोर असेल तर त्याच्या चारही बाजूने पिरॅमिड ठेवावेत. ह्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो.

दुसरी दिशा म्हणजे दाक्षीन आणि पश्चिम ह्यांच्या मधील दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशा. हि दिशा शक्यतो उंच व जड असावी असे वास्तूशास्त्र मानते, अश्या दिशेला जर बोर असेल तर घरात अनेक समस्या निर्माण होतात, आर्थिक अडचणी निर्माण होतात. जर आपल्या घरात देखील अशी बोर असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण बांधलेल्या बोरच्या कठड्याच्या चारही भिंतींना आपण हिरवा रंग द्यावा त्यामुळे वास्तुदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

तिसरी दिशा आहे ती म्हणजे आग्नेय दक्षिण व पूर्व ह्यांच्या मधील हि दिशा. अग्नी व पाण्याचे सख्य नाही म्हणून आपण, मित्रांनो जो बोर आपण घेतला आहे किंवा घेणार आहेत त्याचे पाणी आपण घरातील वापरासाठी केला जातो. म्हणून अग्न्येय तत्व असणाऱ्या दिशेला बोर चुकूनही घेऊ नका, ह्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतात. मानसिक आजार उदभवतात.जर तुमच्या घरात अशी बोर पहिल्यापासून असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण त्याच्या कठड्याला आपण निळा रंग द्यावा त्यामुळे त्या बोरमुळे उत्पन्न होणारे वास्तुदोष ते दूर करते.

हे पण वाचा :-  कवडीचे धनप्राप्ती साठीचे उपाय, वास्तुशास्त्रानुसार करोडो रुपयाच्या आहेत ह्या वस्तू

मित्रांनो ह्या दिशांसोबतच आपण आपल्या टॉयलेट मध्ये, आपल्या बेसमेंट मध्ये, जिन्याच्या खाली, आपला मुख्य दरवाजाच्या जवळ, आपले तळघर आहे अश्या ठिकाणी आपण चुकणहि बोर घेऊ नका त्यामुळे वास्तुदोष उदभवतात. ह्यावरती उपाय काय आहे व त्याची योग्य दिशा काय ते जाणून घेऊयात. वर घेतलेल्या दिशेला जर बोर असेल तर आपण त्या बोरच्या ठिकाणी आरसा लावणे जेणेकरून त्या बोरचे प्रतिबिंब त्यात दिसले पाहिजे हा एक उत्तम उपाय आहे, बोर मुळे उदभवणारे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी.

शक्यतो बोर घरात घेण्याऐवजी ती घराच्या बाहेर घ्यावी. जर चौकनी कठडा न बांधता तो वर्तुळाकार बांधला तर त्याने देखील वास्तुदोष बऱ्यापैकी कमी होतात. एखादा बोर जर कोरडा असेल तर तो वेळीच बुजवून टाकणे फार महत्वाचे असते, घराच्या भिंतीला अगदी चिकटून बोर घेऊ नये.

बोर घेण्यासाठी सर्वोत्तम दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा, उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा. हि देवांची तर दिशा आहेच मात्र हे जलतत्व असणारी दिशा आहे. त्यानंतर दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा, उत्तर दिशेला असणारा बोर हा पैस्यांची आवक वाढवतो. तिसरी दिशा म्हणजे पूर्व दिशा हि दिशा देखील बोर घेण्यासाठी अतिशय शुभ दिशा आहे.

मित्रांनो ह्या तीन दिशा आपण पहिल्या मात्र ईशान्य दिशा दिशेला जर तुम्ही बोर घेत असाल तर तुम्ही तो घराच्या एकदम बाजूला घेऊ नका. किंवा एका कोपऱ्यात घेऊ नका ते आपण थोडासा पूर्वेकडे किंवा थोडा उत्तरेकडे असेल ह्याची आपण काळजी घ्यावी. तर मित्रांनो अश्या प्रकारे आपण बोर घेताना काळजी घ्यावी, जर मित्रांनो लेख आवडला असेल तर लाइक व शेयर जरूर करा.

टीप: लेखात दिली गेलेली माहिती हि धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्या मागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

हे पण वाचा :-  वास्तू शास्त्रा नुसार कपाट आणि तिजोरी या दिशेला ठेवा.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.