आज संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगात सर्व जण दिवाळी साजरी करत असतात किंबहुना करत आहेत. भारतात सर्वात मोठा सण म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. तसेच दिवाळीत आपण लक्ष्मी पूजन करून आपल्या घरी माता लक्ष्मी चे आगमन वर्ष भर व्हवे अशी कामना करतो. तसेच दिवाळीत पाडवा हा साडेतीन मुहूर्ता पैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी अपण विविध वस्तू खरेदी करतो आणि घरी आणतो.
त्याच बरोबर आपण लक्ष्मी पूजन आणि पाडवा साजरा केल्या नंतर पण भाऊबीज साजरी करतो. दिवाळीत भाऊबीज साजरी करण्यामागे एक कथा सागितली जाते. या कथेत यमदेव आपल्या बहिणीला प्रत्येक भावाचे मी रक्षण करेल असे आश्वासन देतो. हि काय कथा आहे या बदल आपण सविस्तर माहिती घेऊ. बहीण भावाचे हे पवित्र नात्या बदल माहिती जाणून घेऊ.
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध दुतीयेस भाऊबीज साजरी केली जाते. सूर्य आणि छाया या दोन अपत्य होती. मुलगा यम आणि मुलगी यमुना. काही वर्षा नंतर यमुनेचा विविह झाला आणि यम आपल्या बहिणीला भेटण्यासाठी खुप कमी वेळेस जात असे. यम हा मुत्यू ची देवता आहे आणि आपली सावली आपल्या बहिणीच्या संसारावर पडूनये म्हणून यम यमुनेला भेटण्यासाठी जात नसे.
आपला भाऊ आपल्या भेटण्यास येत नाही यामुळे यमुना खुप दुखी होत असते. आपला भाऊ यम आपल्याला भेटायला यावे असे सारखे यमुनेला वाटत असे. काही दिवस गेल्यावर यमुनेने यमाकडून वचन घेतले कि भेटण्यास अवश्य यावे. आणि यमाने सुधा वाचन दिले कि मी नक्की तुला भेटणासाठी तुझ्या घरी येईल.
ज्या दिवशी यम आपल्या बहिणीला भेटण्यास गेला म्हणजे यमुनेसी भेटण्यास गेला तो दिवस होता. कार्तिक शुद्ध दुतियेचा. या दिवशी यमाचे बहिणीने खुप सुंदर स्वागत केले. यमुनेच्या आपल्या भावाचे औक्षण केले. जेवण्यासाठी पाच पक्वान्न केले. घरात सर्वत्र दिवे लावले गेले. हि सर्व सेवा पाहून यम आनंदित झाले आणि यमुनेला भेट वस्तू म्हणून अलंकार दिले. आणि यमुनेला मनातील इच्छा विचारली.
यमुनेने मानतील इच्छा म्हणजे वर मागीतला, दरवर्षी या दिवशी यमाने भेटण्यास अवश्य यावे. तसेच या दिवशी ज्या महिला आपल्या भावाला औक्षण करतील त्या भावाचे मुत्यू पासून यमाने सरक्षण करावे. हे वर यमुनेने मागताच यमाने तथास्तु म्हटले आणि त्या दिवसा पासून भाऊबीज साजरी केली जाते.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




