श्री राम नवमी झाली कि सर्वांचे लक्ष जते ते म्हणजे श्री हनुमान जयंती कडे. चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीस या दिवशी संपूर्ण भारतात हनुमान जयंती साजरी केली जाईल. या दिवशी श्री हनुमान जयंती आनंदाने साजरी करा उपासना करा यामुळे आपल्या जीवनातील असंख्य वाईट गोष्टी कमी होतील. त्याच दिवशी आपण काही छोटेसे उपाय करू शकतो ज्यामुळे श्री हनुमानाची कृपा आणि आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर होत राहील.
आपण आज थोडक्यात जाणून घेऊ श्री हुनुमान जयंती च्या दिवशी श्री मारुतीची पूजा कशी करायची. या वर्षीच्या पंचागामध्ये असे हि सगण्यात आले आहे. या वर्षी दोन योगात हि जयंती साजरी केली जाणार आहे. रवि योग आणि हर्ष योग. याच सोबत चित्रा आणि हस्त योग हे दोन नक्षत्र सुद्धा आहेत. सकाळी पाच ते अकरा पर्यंत हनुमानाची पूजा केल्यास चांगले आहे.
श्री हनुमान जयंती
सकाळी लवकर उठून पूर्व दिशेला एक पाट आणि त्यावर एक लाला रंगाचे वस्त्र ठेऊन त्यावर श्री राम आणि श्री हनुमान याची मूर्ती किंवा फोटो ठेऊन त्याची पूजा करायची आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या श्री हनुमान जयंती ज्या दिवशी श्री रामाची सुद्धा अवश्य पूजा करावी लागते. त्या ठिकाणी एक तुपाचा छोटासा दिवा लावावं आणि फुले आणि हार अर्पण करावी. नैवेद्य म्हणून गोड काही तरी अवश्य करावे.
यानंतर ऐकशे आठ वेळा श्री हनुमानाचा आणि श्री रामचा जप अवश्य करावा. तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही श्री हनुमान जयंती च्या दिवशी पूजा करू शकतात. या सोबत याच दिवशी तुम्ही काही छोटे उपाय करून श्री हनुमानाची खुप आपल्या घरावरती आणि आपल्या परिवारावती करून घेऊ शतकात.
पहिला उपाय ज्या घरात लोक सतत आजारी पडतात किंवा घरातील लोक जास्त प्रमाणत आजारी पडूनये ते वाटत असेल तर या दिवशी म्हणजे श्री हनुमान जयंती च्या दिवशी हनुमान बाहुक याचे तीन वेळेस पठण करावे. ज्या व्यक्तींना नौकरी मध्ये प्रगती होण्यासाठी काही अडचणी येत आहेत. अशा व्यक्तीनि संकटमोचन हुमान अष्टकाचा नऊ वेळा जप करावा. यामुळे करियर मध्ये नवीन संधी मिळू शकतात.
हे पण वाचा :- या चुका करू नका देवासमोर दिवा लावताना. या १० नियमांचे पालन अवश्य करा
ज्या लोकंच्या घरात सतत काही न काही अडचणी येत आहेत अशा लोकांनी सुंदर कांडाचा पाठ श्री हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करावा. त्याच सोबत घरात सतत भांडणे होत असतील. घरात एकमेकांचे जमत नसेल. घर तुटण्याची भीती वाटत असेल तर अशा वेळी आपण माता सीता यांच्या पायाला सिंदूर लावायचा आहे. त्याच सोबत घरात सतत नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त आहे असे वाटत असेल. तर एक तुळशीच्या पानावर दोन लवंग ठेऊन श्री हनुमानाच्या पायापाशी अर्पण करायचे आहेत.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




