लाईफस्टाईल

चांगले वागून सुद्धा लोक तुमच्या सोबत नेहमी वाईट वागतात, अश्या वेळी काय करणे योग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते कि कसे वागायचे तेच कळत नाही जास्त चांगले वागायला गेलो तारि लोक त्रास देतात. आणि जास्त वाईट वागले तरी लोक त्रास देतात. लोकांना प्रश्न पडतो कि आम्ही तर सामोर्च्याबरोबर चांगले वागतो पण समोरचा आम्हाला त्रास देतो. नक्की आम्ही वागायचे तरी कसे, चांगले कि वाईट काही कळत नाही.

एकदा एक शिष्य नदीकिनारी त्यांच्या गुरूंना प्रश्न विचारतो कि गुरुजी तुम्ही आम्हाला एवढी चांगली शिकवण देता परंतु ह्या जगात आम्ही वागायचे तरी कसे आम्ही जास्त चांगले वागायचा प्रयत्न केला तरी लोक आमचा फायदा घेतात. अडचणी निर्माण करतात, आजच्या काळात चांगले वागणाऱ्यांशी सुद्धा लोक निंदा करतात. आम्ही जगावे तरी कसे, ह्यावर गुरु सांगतात तुम्हाला मी शब्तात सांगू कि प्रात्यक्षिक करून दाखवू. तेव्हा शिष्य म्हणतात गुरुजी तुम्ही शब्दांनी तर नेहमीच सांगता. परंतु आता प्रात्यक्षिक करून दाखवा, जेणेकरून आम्हाला कसे जगायचे ते तरी समजेल. गुरुजी म्हणतात ठीक आहे.

गुरुजी कडे ३ समान काठ्या असतात, त्यातील एक काठी ते शिष्याला देत म्हणतात ह्या काठीला समोर काटा लाव आणि त्या काठ्याला पीठ लावून मासा पकडून घेऊन ये, त्यावेळी शिष्य म्हणतो ठीक आहे गुरुजी आणि तेवढ्यात तो पाण्याकाठी जाऊन तो मासा पकडतो आणि त्यावेळी तेव्हढ्यात त्याला एक मासा अडकतो तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात तुला जेव्हढी शक्ती लावता येईल तेव्हढी लाव शिष्य त्याच्या ताकदीने खेचतो परंतु जास्त शक्ती लावल्याने ती काठी तुटून जाते.

तेव्हा गुरुजी त्याला दुसरी काठी देतात व सांगतात ह्यावेळी तुला मासा गळाला लागला तर जास्त ताकद लावू नको. त्यावर शिष्य ठीक आहे म्हणून मासा पकडण्यासाठी गाळ पाण्यात टाकतो. पुन्हा एकदा त्याला मासा लागतो ह्यावेळी शिष्य गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जास्त ताकद लावत नाही, मासाच त्या काठीला गळाला आत मध्ये ओढून घेतो. आता गुरु त्या शिष्याला तिसरी काठी देत सांगतात तू ह्यावेळी जास्तदेखील ताकद लावायची नाही आणि कमीदेखील नाही.

जेव्हडा मासा ताकद लावेल तेव्हडीच ताकद लावायची आहे. तेव्हा शिष्य देखील तसेच करतो जेव्हडा मासा ताकद लावत आहे तेव्हढीच तोही लावतो आणि मासा बरोबर पकडला जातो. ह्यावर गुरुजी शिष्याला विचारतात ह्या कृतीवरून तुला काय समजले. ह्यावेळी शिष्य म्हणतो नाही मला काहीच समजले नाही. गुरुजी सांगतात हे जग असेच आहे जेव्हा तू शक्तीचा अजिबात प्रयत्न करणार नाही तेव्हा तुला लोक भित्रा आणि कमजोर समजतील आणि जेव्हा तू शक्तीचा प्रयोग करतील तेव्हा लोकी तूची निंदा करतील.

म्हणतील हा माणूस चांगला नाहीये पण तू स्वतःच्या भल्यासाठी किंवा समाजासाठी काही काम करत असशील तेव्हा लोक तुला अडथळे निर्माण करत असतील तेव्हा तू आवश्यक एवढी शक्तीचा उपयोग करणे अगदी योग्य आहे. आणि तेव्हाच तू काम करू शकशिल. पण तू जर असाच गप्प राहशील तर तू आयुष्यात काहीच काम करू शकणार नाही. त्यामुळे गरज असेल तेव्हा शक्तीचा वापर करणे अगदी योग्य आहे. तू जास्त चांगला बनायचं प्रयत्न करशील तर लोक तुझा लगेच फायदा उचलतील. आणि जास्त वाईत होशील तर लोक तुला नाव ठेवतील, म्हणून नेहमी मधल्या रस्त्याचा अवलंब तू करायला शिकशील.

अशा करतो कि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल. मित्रांनो अशा करतो कि आजच्या लेखातील माहिती तुम्हाला समजली असेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट