नारळाचे झाड घरासमोर असणे शुभ कि अशुभ
वास्तू शास्त्र

नारळाचे झाड घरासमोर असणे शुभ कि अशुभ. वास्तूशास्त्र काय सांगते.

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते आपल्या घरा समोर एक सुंदर झाड आले पाहिजे. झाडे लावल्यामुळे वातावरण चांगले होते शिवाय त्या जागेची शोभा सुद्धा वाढते. आपण सर्वजण खुप आधी पासून ऐकत आलो आहोत झाडे लावा झाडे जगवा. प्रत्येक झाड हे आपल्यासाठी सुंदर असते. प्रत्येक झाड हे पर्यावरणाचे संतुलन चांगले राहण्यासाठी मदत करतात.

वास्तुशास्त्रा नुसार काही झाडे हे आपल्या घरासाठी खुप चांगले असतात. त्यांच्या मुळे आपले नशीब सुद्धा खुप चांगले होते. वास्तुशास्त्रात काही झाडांचा उल्लेख केला आहे. जर का ती झाडे आपल्या घरासोमोर लावली असतील तर त्याचा लाभ सुद्धा खुप चांगला होतो. त्याच प्रमाणे अशी काही झाडे आहेत ती जर का आपण घरात किंवा घरासोमर लावली तर त्याचा परिणाम सुद्धा वाईट पडतो.

नारळाचे झाड हे आपल्या घरासोमर लावल्यास त्याचा परिणाम शुभ होणार कि अशुभ या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तींची रास तूळ किंवा वृषभ आहे. अशा व्यक्तीने आपल्या घरासोमोर नारळाचे झाड अवश्य लावावे. पण त्यात एक गोष्ट लक्षात असुद्या वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीची आणि वस्तूची एक ठरविक जागा दिली गेली आहे. जर का त्या जागेवर ती वस्तू योग्य रित्या ठेवली गेली नाहीतर त्याचा परिमाण योग्य होत नाही.

काही जणांच्या घरात आधीपासून जर का नारळाचे झाड असेल पण कोणतीच प्रगती होत नसेल. म्हणजेच काय तर घरात सतत आर्थिक हानी होणे घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त होणे. याचा अर्थ तुमच्या घराजवळ जे नारळाचे झाड लावले गेले आहे त्याची दिशा कदाचित चुकीची असण्याची शक्यता आहे.

अशी काही झाडे आहेत जी वास्तुशास्त्रा मध्ये खुप महत्वाची मानली गेली आहेत. अशी झाडे लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त पडतो तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन सुद्धा चांगल्या प्रकारे होते. अशी पाच झाडे आहेत ती आपल्या घराभवती असल्यास खुप चांगले असते. ती झाडे म्हणजे तुळस, नारळ, हळद, दुणा, आणि लाजाळू हि झाडे आवश्य आपल्या घराजवळ लावावी.

हि पाच झाडे आपण आपल्या घरासमोर लावत असताना काई नियमांचे पालन अवश्य करावे. ज्या वेळेस आपण झाडे लावण्यासाठी खड्डा खोदतो त्यात थोडे कच्चे दूध टाकवे आणि सोबत तर एक चमचा मध अवश्य टाकावे. ज्या घरासमोर नारळाचे झाड असते त्या घरातील लोकांना मान आणि प्रतिष्ठा असते. समाजात त्या घरातील लोकांना आदराने पहिले जाते.

कोणत्या दिशेला झाड असले पाहिजे या विषयी सर्वांना प्रश्न येत असेल. वास्तूशास्त्रा नुसार नारळाचे झाड हे घराच्या मागच्या बाजूस म्हणजे ज्या ठिकाणी परस भाग आहे त्या ठिकाणी असल्यास उत्तम मानले जाते. त्याच सोबत नारळाचे झाड आपण घराच्या बागेत सुद्धा लावल्यास चांगले मानले जाते. जर का आपल्या घराची प्रगती चंगली झाली पाहिजे असे वाटत असेल तर पश्चिम किंवा दक्षिण या दोन दिशेला आपण नारळाचे झाड लावल्यास चांगले असते.

जर का तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील. कोणत्याही शुल्क गोष्टी मुळे वादविवाद होत असतील. लक्षात घ्या पूर्व, उत्तर किंवा पूर्व आणि उत्तर या दोन दिशा मधील दिशा म्हणजे ईशान्य या ठिकाणी जर का नारळाचे झाड असेल त्याच सोबत ते झाड आपल्या घराच्या उंची पेक्षा जास्त असतील तर लगेच ते त्या ठिकणावरून काढून टाका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट