लाईफस्टाईल

भोगी सनाबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो मकर संक्रांत जवळ येत आहे आणि ह्याच्या आदल्या दिवशी आपण साजरी करतो तो दिवस म्हणजे भोगीचा. खरतर मकर संक्रांत हि तीन दिवस चालू राहते पहिला दिवस भोगीचा दुसरा मकर संक्रांती आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत ह्या लेखात आपण भोगिविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

२०२२ सालात १३ जानेवारी गुरुवारच्या दिवशी भोगी आलेली आहे ह्याचदिवशी पुत्रदा एकादशी देखील आलेली आहे. न खाये भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण आहे म्हणजेच भोगी हा खाण्यापिण्याचा आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे आपले घर, आपले अंगण साफसुथरे करावे दारासमोर एक सुंदर रांगोळी काढावी, घरातील सर्वांनी अभ्यंगस्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत, अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून अंघोळ करण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून आहे.

भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात भोगीची मिक्स भाजी केली जाते तिला लेकरूवाळी भाजी किंवा खेंदाट ह्या नावाने ओळखले जाते सोबतच बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते. सोबतच लोणी, पापड, खिचडी इत्यादी पदार्थ करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. अनेक ठिकाणी मुली आपल्या माहेरी जातात आणि ह्या भोगी सण साजरा करतात.

भोगी साजरी करण्याचे कारण काय, ह्या दिवशी इंद्रदेवाने उदंड पिके पिकवीत म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून हि पिके वर्षानुवर्षे असेच पिकत राहावीत चांगले धनधान्य यावे अश्या प्रकारच्या प्रार्थनेसह हि भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी अनेक राज्यात होळी पेटवून त्यांची आहुती देखील दिली जाते. ह्या दिवशी करण्यात येणारी भाजी असते ती खूप पौष्टिक असते, खूप स्वादिष्ट असते.

खरे तर ह्या हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या येतात, शेतीला नवीन बहार असतो म्हणून ह्या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेला भाकरीचा आस्वाद घेतल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी संपूर्ण वर्षभर काम करण्यास मदत करते. हा भोगीचा सण केवळ महराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो तामिळनाडू मध्ये ह्याला पोंगल, पंजाब मध्ये लोहारी, आसाम मध्ये रोंगाली बिहू, राजस्थानमध्ये उत्तरावण ह्या नावाने साजरा केला जातो.

हि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हि जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकार करण्याचा हा दिवस आहे. आणि वर्षभर काही चुकले असेल तर तिळगुळ देऊन क्षमा मागण्याचा दिवस आहे. वर्षभर नात्यातील गोडवा मधुरपणा असाच टिकून राहूदे अश्या शुभेच्छा ह्या आपण मकर संक्रांती दिवशी देत असतो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट