संपूर्ण माहिती देवघराबद्दल, Complete information about the temple.
वास्तू शास्त्र

संपूर्ण माहिती देवघराबद्दल. देवघरात काय ठेवावे त्याचे स्थान व दिशा सविस्तर माहिती.

अनेकांना आपले देवघर घरात कुठे असावे या बदल माहिती नसते. तसेच काही जण नेहमी चिंतीत असते कि देवघरात कोणत्या देवांचे व देवींचे प्रतिमा किंवा मूर्ती असायला हवी. पूजा अशी करवी या बदल बरेच प्रश्न असतात. देवांचे मुख कोणत्या दिशेला असायला हवे या बदल सुद्धा खुप प्रश्न असतात. त्याचे आजच्या लेखात काही प्रश्नांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सर्वांचे आपल्या घरातील देवघर हे आपले श्रद्धा स्थान असते. आणि आपली ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी आपण कोणतीच चूक होऊनये याची खबरदारी घेत असतो. खरेतर देवघराची दिशा आणि स्थान खुप महत्वाची असते. कारण देवघर हे आपल्या घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा देणारे स्तोत्र असते. आणि घरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या कामात यश प्राप्त करण्यासाठी खुप महत्वाची असते.

घरातील प्रत्येक व्यक्तीला अनुभव आला असेल आपल्या घरातील देव पूजा झाली कि खुप प्रसन्न वाटण्यास सुरवात होते. तसेच नवीन काम सुरु करण्यासाठी सुधा एक प्रकारची ऊर्जा आपल्यात निर्माण होते. खुप जणांना आपल्या घरातील देवघर हे कोणत्या दिशेला असले पाहिजे या बदल खुप मोठ्या शंखा आहेत. आपल्या घरातील देवघर हे उत्तर आणि पूर्व दिशा ज्या ठिकाणी एकत्र येतात म्हणजे ईशान्य कोपरा या दिशेला आपले घरातील देवघर असणे खुप चागले असते.

जर का ईशान्य दिशेला आपले देवघर करता येत नसेल तर हि जागा शक्यतो रिकामी ठेवावी. या जागेवर जास्त वजनाचे किंवा घरातील भंगार साहित्य ठेऊनये. जर का पण ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवले नाही तर इतरत्र दिशेला ठेवल्यास, आपल्या देवघराच्या वरती किंवा खालती टॉयलेट असणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण देवघर करू शकतात. पण देवांचे तोंड हे दक्षिण दिशेला येतील अशा पद्धतीने देव घर करुनये.

देवा घरात कोणत्या देवांच्या प्रतिमा ठेवाव्यात या बदल सुद्धा खुप व्यक्तीना प्रश्न असतात. तर आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांची प्रतिमा अवश्य ठेवा कारण देवपूजा करताना आपल्या इस्ट देवांचे रोज दर्शन होते. तसेच आपली ज्या देवावर किंवा देवीवर श्रद्धा जास्त आहे. त्यांची प्रतिमा ठेवली तरी चालते. शक्यतो आपल्या पूर्वजांची प्रतिमा देवघरात येऊनये.

काही लोक देवघराच्या वरती बरेच अवजड साहित्य ठेवतात हे योग्य नाही. आपण रोज देवासोमर जो दिवा लातो तो आपल्या देवघरात आपल्या उजव्या हाताला असावा, तसेच देवघरात एकाच देवी देवतांची एक पेक्षा जास्त मूर्ती किंवा प्रतिमा असूनये. त्याच बरोबर आपली पूजा करण्याची पद्धत हि आपल्या श्रद्धे प्रमाणे असावी किंवा आपल्या श्रद्धे प्रमाणे करावी.

देवपूजा करताना किंवा झल्यावर दिवा आणि उदबत्ती लावावी. तसेच दिवपूजा झल्यावर घंटा नाद व शंख नाद करावा. तसेच देवपूजा झाल्यावर लगेच त्या जेवरून न उठता दोन ते तीन मिनिट डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करावे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट