गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती, गुढीपाडव्याची पूजा कशी करायची आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती., Complete information of Gudipadva.
धार्मिक

गुढीपाडव्याची पूजा कशी करायची आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती.

येत्या गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्षाला सुरवात होत असते. गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. गुढीकशी उभा करायची आणि गुढीची पूजा कशी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दर वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेस गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक आहे.

गुढी कशी उभी करावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यादिवशी घरातील सर्व व्यक्तीने सकाळी लवकर उठून नित्यकाम पूर्ण करून अंघोळ करून जमत असेल तर नवीन कपडे परिधान करवावे किंवा स्वच्छ कपडे परिधान केले तरी चालतात. या दिवसा पासून आपले नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे अगदी आनंदाने त्याचे स्वागत करावे यामुळे संपूर्ण वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जाईल.

गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती.

सुरुवातील एक काठी घ्याची आहे. त्या काठीला स्वच्छ धून घ्याचे आहे. काठीच्या एका बाजूस कोणत्याही रंगाची साडी बांधावी फक्त काळ्या रंगाची नसावी याची काळजी घ्यावी. साडी बांधल्या नंतर अंब्याचे पाने आणि कडू लिबची पाने या साडी वरती बांधायची आहेत. एक सुंदर फुलांचा हार त्यावर बांधावा. साखरेच्या गाठींची माळ त्या ठिकाणी बांधावी. आणि तांब्याचा तांब्या घ्याचा आहे. आणि तो उलट त्या ठिकाणी लावायचा आहे. जर का तांब्याचा तांब्या नसेल तर स्टीलचा सुद्धा चालतो.

आपण जी गुढी उभारतो त्याला ब्रम्ह ध्वज असे म्हणतात. त्यामुळेच आपण हि गुढी उभारताना आनंदाने आणि श्रद्धेने उभा करायची आहे. गुढीची पूजा करताना काही नियमांचे आपण पालन करावे. सुरवातीला आपल्या मुख्य दरवाज्यावरी अंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. त्यनंतर देवघराला सुद्धा तोरण बांधावे. त्यनंतर एका छोट्या डिश मध्ये गंध तयार करून घ्यावे. आणि पाच टिपके आणि स्वतिक त्या तांब्यावर काढावे.

गुढी उभी करताना एका पाटावर करवी. त्यनंतर गुढीची पूजा करावी. त्या काठीला गंध लावावा. उदबत्ती ओवाळून फुल अर्पण करावे. आणि त्यनंतर गुढीला नेवैद्य दाखवावा. नेवैद्य म्हणून जे काही गोड केले आहे ते दाखवावे. साखर भात असेल, पुरण पोळी असेल किंवा खीर केलेली असे. यापैकी कोणताही एखादा पदार्थ नेवैद्य म्हणून दाखवला तरी चालतो.

गुढीपाडवा का साजरा करतात.

गुढीपाडवा हा चैतन्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण देशभरात गुढी उभारली जाते. ब्रम्हपुराणात असे संगितले गेले आहे. यादिवशी ब्रम्हदेवाने या श्रीष्टीची निर्मिती केली होती. म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेस केली होती. अर्थवेदात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. याच दिवशी प्रभू श्री रामचंद्राने सीतामातेला अयोध्येत रावणाचा वध करून आणले होते. म्हणूच हा विजयाचा दिवस म्हणू हा गुढीपाडवा दिवस साजरा केला जातो.

यादिवशी कडुलिंबाच्या झाडाला जो काही तुरा येतो याला खुप महत्व आहेत, आरोग्य साठी. एक छोट्याशा वाटीत कडू लिंबाच्या झाडाला आलेला जो तुरा आहे हा थोडा घ्याचा आहे. त्यात थोडे मीठ, हिंग, काळे मिरी, ओवा, गूळ हे सर्व घराक चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. आणि हा पदार्थ प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळे आरोग्याला. खुप फायदे होतात. ज्या लोकांना पित्ताचा त्रास हे तो कमी होतो, तसेच उष्णतेचा त्रास कमी होते. त्याच सोबत कडुलिंबाच्या झाडाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास चांगले असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट