सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि रहस्य जाणून घेऊ., Saptashrungi Devichi Vaishist complete information
धार्मिक

सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि रहस्य जाणून घ्या.

महाराष्ट्रा मधील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी देवी म्हणजेच वणीची देवी आहे. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवी चे ठिकाण आहे. नाशिक पासून साधारणता ६० किलोमीटर अंतर आहे. सप्तशृंगी गड हे सयाद्रीच्या डोगरावर्ती आहे. सात शिखर पासून तयार झालेले हे शखर असल्यामुळे त्याला सप्तशृंगी गड असे म्हणतात. गडाच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव आहे. या ठिकाणी जाण्यासाठी नाशिक मधून खाजगी आणि एसटी बसेस आहेत. सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊ

सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती

वणीची सप्तशृंगी देवी, Saptashrungi Devi of Wani

गडावर जाण्यासाठी आणि खाली उत्तरण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत. त्याच सोबत त्या ठिकणी रोपवेचे सुद्धा नियोजन केले आहे. गड चढण्यासाठी जवळ पास पाचशे पायऱ्या आहेत. सप्तशृंगी गडावर खुप प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्याच सोबत गडावर बरेच कुंड आहेत. कालीकुंड, सूर्यकुंड, आणि दत्तत्रेकुंड असे कुंड असून एका बाजून खोल दरी आहे. तसेच या ठिकणी मार्कण्डेय ऋषींचे वास्तव्य या ठिकाणी होते.

मंदिराची वैशिष्ट

सप्तश्रृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून दोन्ही बाजूस नऊ आणि नऊ असे एकूण अठरा हात देवीस आहेत. प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेत. देवीला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपली शस्त्रे दिली होती महिषासुराचा वध करण्यासाठी. सप्तश्रृंगी देवीची संपूर्ण मूर्ती हि शेंदुराने लिंपली आहे. मंदिरा पवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. हे तीनही दरवाजे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.

सप्तशृंगी देवीचा गड, Saptashrungi devicha gada

राम आणि रावण यांचे युद्ध झाले त्या वेळेस लक्ष्मण जखमी झले त्यावेळेस मारुती द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी गेले होते. द्रोणागिरी पर्वत आणताना त्याचा काही भाग खाली पडला होता तोच सप्तश्रृंगी देवीची गड होय, तसेच राम यांच्या वनवासात येते दर्शन येऊन घेतले होते. या गडावर संजीवनी बुटी आहे पण कलियुगात याचा वापर होऊनये म्हणून देवीने हि गुप्त ठिकणी ठेवली आहे असे सुद्धा म्हंटले जाते.

व्हेगन डाएट म्हणजे नक्की काय. त्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात जाणून घेऊ.

दरवर्षी मोठी जत्रा

सप्तशृंगी देवीचा गड हे एक शक्तीपीठ असल्यामुळे दरवर्षी नवरात्रा मध्ये खुप मोठी यात्रा असते. देवीच्या दर्शना साठी संपूर्ण देशातून भक्त येत असतात. राज्यात बऱ्याच भक्तांची देवी हि कुलदैवत आहे. यामुळे बरेच भक्त वर्षातून एकदा तरी दर्शना साठी येऊन जातात. तसे पाहिले गेल्यास बाराही महिने या ठिकाणी भक्तांची गर्दी असते.

गडावरचे वातावरण खूप चागले आहे. सर्व बाजूने डोगर असून त्यावर खुप विविध प्रकारची वनस्पती आहे. निसर्गरम्य वातावरण सर्वाना आनंद देऊन जातो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “सप्तशृंगी देवीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि रहस्य जाणून घ्या.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट