कोरोना विषाणू लठ्ठ लोकांसाठी अधिक प्राणघातक आहे?
लाईफस्टाईल

काय कोरोना विषाणू लठ्ठ लोकांसाठी अधिक प्राणघातक आहे?

आतापर्यंत आपल्याला  ठाऊक आहे की लठ्ठ लोकांमध्ये हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहासारख्या यासारखे आजारांचे उच्च प्रमाण आहे.परंतु आता सुरुवातीच्या संशोधनात असेही आढळले आहे की लठ्ठपणा असलेल्या लोकांना कोविड -१९  च्या संसर्गाचा धोका अधिक असू शकतो.

याचा काही पुरावा आहे का?
जरी या प्रश्नाचे उत्तर पुष्कळ प्रकारच्या अभ्यासानंतरच निश्चित केले जाऊ शकते, परंतु तज्ञांनी या काही आकडेवारीच्या आधारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, लठ्ठपणाचा या रुग्णांच्या रोगप्रितकार शक्तीवर परिणाम झाला आणि त्यामुळेच ते कोरोनाशी लढा देऊ शकले नाहीत.ब्रिटनमध्ये १७ हजार  लोकांच्या अभ्यासानुसार हे दिसून आले कि जे लोक लठ्ठ होते आणि ज्यांचं  30 च्या वर बॉडी-मास इंडेक्स होता त्यांचा मृत्यू दर 33 टक्के जास्त होता.

people with obesity

दुसर्‍या अभ्यासानुसार अशा लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण दुप्पट असल्याचे आढळले.संशोधकांचे म्हणणे आहे की हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार देखील  असतील तर हा आकडा अधिक वाढेल.

शरीराच्या वजनाच्या त्यांच्या लांबीचे गुणोत्तर बीएमआय म्हणतात. बीएमआय सह आपण एक व्यक्ती जास्त वजन, लठ्ठ आणि निरोगी असल्याचे शोधता येते.वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन च्या अनुमानानुसार ‘बीएमआय 25 च्या वर’ असलेल्या लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे.शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे पेशींमध्ये एसीई -2 नावाचा एन्झायम आणि हा एन्झाईम  लठ्ठ लोकांमध्ये जास्त प्रमाणात फॅट असल्यामुळे असतो जेणेकरून कोरोना विषाणूचा शिरकाव या लोकांमध्ये लवकर होतो.

तुमचे वजन जितके जास्त असेल तितके तुमच्या शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते तेवढेच ते तुमच्या शरीराला घटक असते. याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर होतो. यामुळे आपल्या रक्तास ऑक्सिजन पोहोचणे अवघड होते आणि नंतर त्याचा परिणाम रक्तप्रवाह आणि हृदयावर होतो.

ग्लासगो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नवीद सत्तार सांगतात कि “जास्त वजन असलेल्या लोकांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. यामुळे त्यांच्या सिस्टमवर अधिक ताण येतो.”आणि हे कोरोनासारख्या संसर्गाच्या वेळी ते धोकादायक ठरू शकते.जादा वजन किंवा लठ्ठ लोकांना आयसीयूमध्ये ऑक्सिजन देण्याची आवश्यकता असते आणि त्यांच्या किडनीची हि विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट