CIBIL Score Explained in Marathi
अर्थ

CIBIL स्कोर (CIBIL Score) म्हणजे काय हे तुम्हला माहित आहे का? तो कसा तयार होतो याबद्दल माहिती.

प्रत्येक व्यक्ती हा बँकेत जातो आणि कर्जाची मागणी करकतो. आणि त्यावेळेस त्याला विचारण्यात येते कि तुम्हचा सिबिल स्कोर (CIBIL score) काय आहे. किंवा तो त्याठिकाणी बघितला जातो. ज्या वेळी तुम्हचा सिबिल स्कोर (CIBIL score) चागला असेल तर लगेच काही कागदपत्रांची पुरतता केली कि बँक तुम्हला कर्ज देते. किंवा त्याउलट जर का तुम्हचा सिबिल स्कोर (CIBIL score)  कमी असेल तर तुम्हला एखाद्या वेळेस कर्ज नाकारले जाऊन शकते किंवा जास्त व्याज दर सांगून कर्ज दिले जाते.

CIBIL स्कोर (CIBIL Score) म्हणजे काय

Credit Score Explained in Marathi

अनेक लोक असंख्य प्रकारचे लोन घेतात जसेकी वैयक्तिक कर्ज (personal loan), गृहकर्ज (home loan), कार लोन (car loan) या मध्ये प्रत्येक व्यक्तीचा  सिबिल स्कोर (CIBIL score) चेक केला जातो.  सिबिल स्कोर (CIBIL score) म्हणजे, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (credit information bureau (india) limited) असा आहे. त्याच सोबत याला  क्रेडिट स्कोर (Credit Score) असे सुद्धा बोले जाते.

सिबिल स्कोर (CIBIL score) हा तयार करण्यासाठी एक कंपनी काम करते. त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) ने मान्यता दिली आहे. हि कंपनी प्रत्येक व्यक्तीची आर्थिक माहिती ठेवते जसेकी त्या व्यक्तीने कोणते लोन घेतले आहे का, किंवा कोणत्या कंपनीने कोणते लोन घेतले आहे का. या बदलाची सर्व माहिती गोळा करते. तसेच घेतलेल्या कर्जाची परत फेड योग्य वेळात करतात कि नाही याची सुद्धा दखल घेतली जाते.

हि सर्व माहिती गोळा केल्यानंतर सिबिल स्कोर (CIBIL score) काढला जातो. पण त्या आधी सुद्धा इतर माहिती सुद्धा ते गोळा करत असतात. जसे कि आपल्या कडे किती क्रेडिट कार्ड (credit card) आहे. त्याची लिमिट किती आहे. तसेच कोणत्या बँकेत आपली खाती असून कोणत्या बँकेत आपले कर्ज आहे. तसेच ते कर्ज कोणत्या स्वरूपाचे आहे. हि सर्व माहिती प्रत्येक बँक कडून घेली जाते.

सर्व बाबी तपासल्या नंतर सिबिल स्कोर (CIBIL score) काढला जातो हा स्कोर तीनशे ते नऊशे (300 to 900) मध्ये काढला जातो. ज्या लोकांचा स्कोर नऊशेच्या जवळ असेल त्यांना बँका लगेच लोन देतात तर ज्यांचा स्कोर हा सतशेपन्नास पेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला बँक काही वेळेस कर्ज नाकारू शकते तर काही वेळेस जास्त व्यज दर देऊन कर्ज पुरवठा करते.

या साठी सर्वानी आपला सिबिल स्कोर (CIBIL score) चागला ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. हा क्रेडिट स्कोर (Credit Score) हा मागील सहा महिन्यातील आर्थिक व्यवहारावर निगडित असतो. सिबिल स्कोर (CIBIL score) हा काही महत्वाच्या घटकांचा विचार करून काढला जातो. त्या पहिला आहे तुम्ही भरलेल्या कर्जावरील हप्ते. जर का तुम्ही आधी कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते भरले आहेत का तसेच ते हप्ते वेळेवर भले आहेत का. याचा सुद्धा विचार केला जतो. जर का तुम्ही वेळेवर हप्ते भरले नसतील तर तुम्हचा क्रेडिट स्कोर (Credit Score) कमी होऊ शकतो.

दुसरी बाब म्हणजे क्रेडिट लिमिट. आपल्या इतर काही स्वस्थ क्रेडिट देतात त्याचा जर का आपण पूर्ण उपयोग केला तर आपल्या क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. जसे कि आपण एखाद्या बँकेचे क्रेड कार्ड घेतले असेल महिन्याला त्याची एक लिमिट असते ती वारंवार वापरत असतोल तर आपला क्रेडिट स्कोर (Credit Score) कमी होऊ शकतो. यामुळे क्रेडिट लिमीटचा वापर गरज असेल त्यावेळेस करा.

तिसरी बाब म्हणजे आपण कोणत्या प्रकारे कर्ज घेतले आहे ते. म्हणजे दोन प्रकारचे लोन असतात एक सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज (secured loan and unsecured loan) सुरक्षित कर्ज म्हणजे लोन घेताना प्रत्येक कागद पत्राची पूर्तता करून त्यावर मंजुरी घेऊन घेतलेले कर्ज तर असुरक्षित कर्ज म्हणजे जास्त कागद पत्राची पूर्तता नकरता तसेच कोणतीही मंजुरी न घेता घेतलेले कर्ज. जर का आपण असुरक्षित कर्ज (unsecured loan) जास्त प्रमाणत घेतले असेल तर आपला सिबिल स्कोर (CIBIL score) कमी होऊ शकतो. तसेच या उलट जर का पण सुरक्षित कर्ज (secured loan) घेतले असेल तर आपला सिबिल स्कोर (CIBIL score) वाढण्यास मदत होऊ शकते.

चौथी गोष्ट जर का आपल्याला कर्जाची कोणतीच आवशक्यता नसतात विविध बँकेकडे विनाकारण चौकशी करत असतोल तर आपला सिबिल स्कोर (CIBIL score) कमी होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात ज्या वेळेस खरेच कर्ज हवे असेल त्यावेळेस सिबिल स्कोर (CIBIL score) कमी असल्या मुले त्रास सहन करावा लागू शकतो. त्यापेक्षा ज्या वेळेस आपल्याला कर्जाची आवश्यकता असते त्यावेळेस चौकशी करा. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर (CIBIL score) चागला राहील.

आपला सिबिल स्कोर (CIBIL score) कुठे मिळेल हा सर्वाना प्रश्न येत असेल. काही वर्षा आधी सिबिल स्कोर (CIBIL score)साठी पैसे द्यावे लागत असे पण सध्याचा घडीला बरेच वेबसाइट आणि अँप आहेत. ते काही वेळेस फ्री मध्ये सिबिल स्कोर (CIBIL score) काढून देतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या लेखात प्रदान केलेली ही सामग्री कठोरपणे शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे आणि कोणत्याही प्रकारची सल्ला किंवा शिफारस करण्याचा हेतू नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट