वैशाख महिन्याच्या तृतीयेस अक्षय तृतीय म्हणून ओळखले जाते. अक्षय तृतीयेला सर्वात जास्त महत्व आहे. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्ता पैकी एक असल्यामुळे या दिवशी विशेषे पूजा सुद्धा केली जाते. बरेच व्यक्ती आपल्या नवीन कामाची सुरवात या ददिवशी करता. यादिवशी सुरू केलेली कामे हि असंख्य दिवस चालत राहते.
विशेष म्हणजे जुन्या काळी शेती साठी लागणारे विविध अवजारे तयार करण्याचे काम या दिवसा पासून कारागीर सुरवात करतात. शेतातील विविध कामाची सर्वात या दिवसा पासून होते. म्हणूच शेतकरी लोक या दिवसाला खुप महत्व देतात. चैत्र गौरी चे विसर्जन या दिवशी होते. चैत्र गौरीच्या निमित्याने महिला आपल्या घरी हळदी कुंकूला इतर महिलांना बोलवतात.
या वर्षी अक्षय तृतीयेला बऱ्याच वर्षा नंतर दुर्मिळ योग्य जुळून आला आहे. या दिवशी विशेष पूजा कशी करायची आणि काय आहे हा दुर्मिळ योग याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊन तसेच. पूजा करून याचा लाभ जास्तीत जास्त प्रमाण करून घेऊ शकतो. अशी एक मान्यता आहे कि जर या दिवशी आपण मंत्र पठण किंवा जप केल्यास त्याचे लाभ जास्त काळ आपल्या पाठीशी राहतात.
या दिवशी केलेले दान किंवा हवन हे क्षयाला जात नाही. अक्षय राहते असे भगवान श्री कृष्णाने युधिष्टीर ला असे संगितले होते. म्हणून या तिथीला अक्षय तृतीय असे म्हणतात. आपले पितृ आणि भगवन यांच्या नावाने केलेली पूजा, जप मंत्र पठण यांसह लाभ कधीच वाया जात नाही. जे व्यक्ती या दिवशी गंगा स्नान करेल त्यांनी केलेल्या पापातून मुक्तता होते अशी मान्यता आहे.
अक्षय तुतीच्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी श्री परशुराम यांच्या अवतारात श्री हरी विष्णू प्रकट झाले होते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आर्थिक समस्यांचे निराकान होते अशी मान्यता आहे.
सकाळच्या सर्व विधी पूर्ण झाल्यावर देवाची पूजा करून करावी त्यानंतर देवघराच्या बाजूला एक पाठ ठेऊन त्यावर एक स्वच्छ वस्त्र ठेवावे आणि त्यावर माता लक्ष्मीची आणि श्री हरी विष्णू यांची प्रतिमा ठेवावी. दोन्ही देवतांना पंचामृताने अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर हळदी कुंकू व्हावे. तसेच तुळशीचे पाने आणि फुले अर्पण करावी. धूप आणि दीप दाखवून नैयेवैद्य दाखून पूजा पूर्ण करावी. घरातील सर्व व्यक्तीना प्रसाद द्यावा.
या दिवशी केलेले दान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. तसेच या दिवशी केलेले देवाचे नामस्मरण सुद्धा अनंत काळापर्यंत सोबत रहाते. यावषी काही विशेष योग जुळून आले आहेत. यावर्षी अक्षय तृतीय हि मंगळवारी अली आहे. तसेच या दिवशी रोहिणी नक्षत्र सुद्धा असल्यामुळे यादिवशी मंगल रोहिणी योग तयार होणार आहे.
तसेच या दिवशी दोन ग्रह हे आपल्या स्वतःच्या राशीत असतील तर इतर दोन ग्रह हे उच्च राशीत असली अशा हा संयोग हा तब्ब्ल ५० वर्षीनी आला आहे. त्याच बरोबर शुक्र ग्रह मिन राशीत असेल तर चंद्र हा वृषभ राहील. कुंभ राशीत शनी तर मिन राशीत गुरु असेल. ज्योतिष शास्त्रात याला खुप मोठा संयोग मानला जात आहे.
अक्षय म्हणजे कधीच न संपणारी शक्ती. यामुळेच पंच महाभूते सुद्धा अक्षय मानली जातात. वैशाख महिना खुप उष्ण मानला जातो यामुळेच या दिवशात मातीचे भांडी दान करणे खुप चांगले मानले जाते. दान हे आपल्याला त्यागाची भावना शिकवते. इतर व्यक्तीला कोणतीही गरज लागत असेल तर आपल्या हातून मदत व्हावी यासाठी आपल्यावर दानाचे संस्कार होत आले आहेत.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




