वास्तू शास्त्र

दररोज देवपूजा करताना ह्या चुका करू नका, परत पश्चाताप करण्यापेक्षा एकदा नक्की वाचा.

नमस्कार मित्रांनो तुमचे आजच्या लेखात स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. घरात पूजा करताना त्याचे तोंड हे पश्चिम दिशेला असेल तर ते अत्यंत शुभ असते त्यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असेल तरी देखील ते शुभ असते. त्या व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते. घरात देवघर अश्या ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश पोहचेल. ज्या घरात सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरात अनेक दोष आपोआप नष्ट होतात.

सूर्यप्रकाशामुळे घरातील नाकारात्मक ऊर्जा संपते व सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चाम्बड्यापासून तयार केलेल्या वस्तू ग त्यात चप्पल असो किंवा बूट असेल अश्या वस्तू अजिबात जाऊ देऊ नयेत. देवघरात मृत तसेच पूर्वजांचे फोटो लावू नयेत, पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य मानली जाते. देवघराच्या खोलीत पुजेशी संभंदीत समानच ठेवावे. देवघराच्या जवळपास बाथरूम असणे देखील अशुभ मानले जाते. त्यामुळे अश्या ठिकाणापासून देवघर लांब ठेवा.

एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर त्या ठिकाणी एका व्यक्तीला बसता येईल इतकीशी तरी जागा मोकळी ठेवावी. घरात देवघर असेल तर सकाळी व संध्याकाळी देवपूजा करणे अवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी, तसेच घंटानाद करावा असे केल्याने नाकारात्मक शक्ती निघून जातात. पूजेत सुकलेली फुले, पाने अजिबात ठेवू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा वापर करावा ह्या संधर्बात दोन गोष्टी अपवाद आहेत ते म्हणजे गंगेचे पाणी आणि तुळशीचे पाने त्यामुळे हे सोडून बाकी सर्व सामग्री ताजी असावी.

एखाद्या फुलचा वास घेतला असेल किंवा ते फुल खराब झालेलं असेल तर ते फुल देवाला अर्पण करू नये. रोज रात्री झोपण्यापूर्वी पडदा टाकून देवघर झाकावे ज्या प्रमाणे आपल्याला रात्री झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही अगदी त्याचप्रमाणे मंदिरावर पडदा टाकावा. वर्षभरात जे पण शुभ मुहूर्त येतात. तेव्हा संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे, ह्यामुळे घरात पवित्रता कायम राहते. वातावरण देखील सकरात्मक होते.

शास्त्रानुसार गोमूत्र घरात अत्यंत शुभ असा प्रभाव टाकते अश्या वेळी दैवी शक्तींची देखील कृपा होते. शास्त्रानुसार भंगलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती त्यांची पूजा करणे वर्ज मानलेले आहे. अश्या मूर्ती लगेचच घरातून बाहेर काढून त्यांचे एकाद्या पवित्र नदीत विसर्जित करावे. ह्या बाबतीत एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे कि शिवलिंग हे कधीही कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही. शास्त्रानुसार घरातील शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या आकाराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे लाभदायक आहे. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवणे वर्ज आहे.

देवघरातील इतर देवीदेवतांच्या मूर्ती देखील लहान असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मंदिरांसाठी श्रेष्ठ असतात मात्र मंदिरात मात्र छोट्याच अकराच्या असाव्यात. मित्रांनो ह्या अगदी लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपल्या मंदिरासंधार्बत आहेत आणि त्याकडे आपण लक्ष दिले तर आपली देवपूजा फलपुर्वक होईल.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट