नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २० जुलै उद्या एकादशी आहे आषाढ महिन्यातील हि पहिली एकादशी. ह्या दिवशी श्रद्धापूर्वक उपवास करतात व भगवान विष्णूंचे पूजन करतात त्यांच्या सर्व कष्टांचे निवारण होते आणि त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
श्री हरी विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात. आज आपण आपल्या लेखात एकादशी दिवशी करता येतील असे काही छोटे पण प्रभावी उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा होईल व तुमची धनसमस्या दूर होतील.
एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंना केशर घातलेल्या दुधाने अभिषेख करावा असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. एकादशी च्या दिवशी पहाटे स्नान झाले कि गायत्री मंत्राचा जप करावा ह्यामुळे देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंची आपल्यावरती कृपा होते. मित्रांनो आपण भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन आपण त्यांना पांढऱ्या मिठाईचा नैवैद्य दाखवावा व त्या नैवेद्यात तुळशीची पाने ठेवण्यास विसरू नये. तुळस ठेवून दाखवल्या नैवैद्यामुळे भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात.
आपल्या कामत काही अडचणी येत असतील हातात घेतलेले काम जर पूर्ण होत नसेल तर श्री हरी विष्णूंना एक नारळ व पाच बदाम अर्पण करावेत ह्यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपले काम यशस्वी होते. एकादशीच्या दिवशी आपण पिवळी वस्त्रे धारण करावीत, पिवळे धान्य, पिवळी फुले, पिवळी मिठाई श्री हरी विष्णूंना अर्पण करून त्या वस्तू आपण गोरगरिबात वाटाव्यात ह्यामुळे श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावरती होते.
एकादशीच्या दिवशी आपण जर आपल्यावरती कर्ज खूप झाले असेल तर त्यावर उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करून त्या झाडाखाली दिवा लावावा कारण पिंपळाच्या झाडात विष्णूंचा वास असतो आणि ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास साक्षात श्री हरी विष्णूंचे पूजन केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते.
एकादशीच्या दिवशी आपण भगवंतांचे पूजन करताना काही पैसे भगवंतांच्या मूर्तीसमोर काही पैसे अर्पण करावेत व ते पूजा झाल्यानंतर आपण आपल्या पाकिटात ठेवावे असे केल्याने आपल्या पाकिटात सतत पैसे येत राहतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




