धार्मिक

धनतेरसे दिवशी देवी लक्ष्मीची प्रतिमा निवडताना व त्याची पूजा करताना काय करावे व काय करू नये ते जाणून घ्या.

coffeewithstories.com वरती तुमचे हार्दिक स्वागत अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा. मित्रांनो भारतातील सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या सणाची संपूर्ण वर्षात मिळणारी सुट्टी म्हणजे दिवाळी, आता अगदी जवळ आली आहे. हा पाच दिवसीय महोत्सव धनतेरसपासून सुरू होतो आणि बहुदुजेला संपतो. सुखी व शांत चित्ताने ह्या दिवशी आपण ऐश्वर्य व बुद्धीची देवता असलेले लक्ष्मी व गणेश यांची पूजा आपण करतो. घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर असो ह्याकरिता आपण दिवाळीच्या दिवशीची पूजा अगदी मनोभावनेने केली पाहिजे. चला जाणून घेऊयात की लक्ष्मी मातेची व अन्य देव देवतांची पूजा कोणत्या दिशेमध्ये करणे शुभ असते.

वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तुमधील उत्तर दिशा संपत्तीची दिशा मानली जाते, म्हणून दिवाळीमध्ये, लक्ष्मीपूजन आणि गणेश पूजनासाठी हि दिशा सर्वोत्कृष्ठ आहे.

धनतेरसे दिवशी देवी लक्ष्मीची प्रतिमा

दक्षिण दिशेला देवी आणि हनुमानजीची उपासना करावी , ईशान्य दिशेस भोलेनाथ शिव, राधा-कृष्ण यांची पूजा उपासना करावी आणि पूर्वेस रामाची पूजा, भगवान विष्णूची पूजा आणि सूर्याची पूजा केल्यास कुटुंबाचे भाग्य वाढते.

पश्चिम दिशेने गुरु, महावीर स्वामी, भगवान बुद्ध यांची उपासना केल्यास शुभ फल मिळतात.

कशी असली पाहिजे माता लक्ष्मी ची प्रतिमा…

लक्ष्मी मातेच्या अश्या फोटो ची पूजा करा ज्यामध्ये एका बाजूला श्रीगणेश तर दुसरीकडे सरस्वती मां विराजमान आहेत आणि देवी लक्ष्मी दोन्ही हातांनी पैशाचा वर्षाव करीत आहेत. धनप्राप्तीसाठी अश्या फोटो ची पूजा करणे फार शुभ असते. जर तुम्ही बसलेल्या लक्ष्मीचे चित्र घेऊन येत असाल तर लक्ष्मी माता यांचे ते चित्र घेऊन या, ज्यामध्ये लक्ष्मीजी लाल वस्त्र परिधान करुन कमळाच्या आसनावर बसले आहेत.माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि गणेशजी यांच्या दोन्ही बाजूला हत्ती सोंड उभा केलीली असावी. अश्या प्रकारच्या प्रतिमेचे पूजन केल्याने माता लक्ष्मी ची कृपा नेहमीच आपल्यावर राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरी नेहमी विराजमान राहतील.चित्रात आई लक्ष्मीचे पाय दिसत नाही ना याची दक्षता घ्यावी ,अन्यथा लक्ष्मी जास्त दिवस घरात राहत नाही.म्हणून, कमळांवर आनंदी मुद्रामध्ये लक्ष्मी बसणे सर्वोत्तम मानले जाते.

चित्रात आई लक्ष्मीबरोबर एरवत हत्ती देखील असतील तर ते आणखी शुभ मानले जाते.आपल्याकडे भगवान विष्णूसमवेत लक्ष्मीची छायाचित्रे असल्यास आपण तिची पूजा देखील करू शकता. श्री हरि यांना आमंत्रण देऊन आई लक्ष्मीला घरी बोलावले जाते.भगवान विष्णू सोबत गरुडावर बसून येणारी देवी खूप शुभ मानली जाते.

 

चुकून सुद्धा लावू नका आई लक्ष्मी ची प्रतिमा…

ज्या प्रतिमेत माता लक्ष्मी एकट्या असतील अश्या प्रतिमेचे पूजन दिवाळीमध्ये करू नये. धार्मिक ग्रंथांनुसार एकट्या लक्ष्मी आई च्या चित्राची पूजा करण्यापेक्षा गणेश आणि सरस्वतीची यांचा समवेत उपासना करणे अधिक फायदेशीर आहे.दिवाळी च्या पूजेमध्ये माती लक्ष्मी-गणेश इत्यादींच्या प्रतिमा किंवा मुर्त्या नवीन असाव्यात जर मुर्त्या चांदीच्या असतील तर चांदीच्या मूर्ती स्वच्छ करुन पुन्हा पूजा केल्या जाऊ शकतात.तुटलेल्या व फाटलेल्या चित्राची उपासना कधीही करु नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट