धार्मिक

दिव्यातील काजळीला असा आकार आला तर काय आहे संकेत.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी कधी पाहतो कि दिव्याच्या वातीवर कधी कधी काळजी आलेली असते. त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो. कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो. दिव्यात हे काळ्या रंगाचे फुल का बनते आणि ह्याचे काय महत्व आहे. कधी कधी दिवा शांत झाला कि त्यानंतर हे फुल बनते तर कधी कधी दिवा सुरु असतानाच हे फुल तयार झालेलं दिसते.

हे फुल कशामुळे बनते ह्याचा आपल्या पूजनाशी काही संबंध आहे का ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेउयात. दिव्यात फुल बनणे हे एक साकारत्मकतेचे प्रतीक आहे. ह्याचाच अर्थ असा होतो कि आपल्या इष्ट देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण भगवंताचे जी काही उपासना करीत आहोत. ती भगवंतांपर्यंत पोहचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहे.

दिव्यात हे फुल दरोरोजच बनत नाही हे फुल कधीतरी दृष्टीस पडते. दिवा आपण दररोज लावतो मग हे फुल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, मग देवाची कृपा आपल्यावर नाहीका भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते. परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत. दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात. म्हणून दिव्यात फुल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही.

आता आपण जाणून घेउयात दिव्यात जे फुल बनते त्याचे आपण काय करावे. मित्रांनो जर तुम्हाला असे फुल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगत काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी आपण लावावा त्यामुळे भागवतांचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहील. आपल्याला आसपास सकरात्मक ऊर्जा असलेले जाणवेल. आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील. आपले सर्व काम बिना अडथळ्याचे व यशस्वीरीत्या पार पडेल.

आपण जर हा टिळा जर कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अश्या नकारात्मक शक्तींपासून चार हाथ अगदी लांब असू. जर भगवंतांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोण्हीदेखील रोखु शकत नाही. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट