नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बलिप्रतिपदा दिवाळीतील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा हि का साजरी केली जाते, ह्याचे महत्वव काय आहे, आणि ती साजरी कशी करावी ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. अत्यंत दानशूर आणि दान कोणाला द्यावे ह्याची जाण नसलेल्या बळीराजाला श्री विष्णूंनी त्याला पाताळात धाडले तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा ह्याच दिवशी उत्तर भारतात आणि मध्य भारतात नवीन विक्रम सव्वीता ह्याची सुरुवात होते.
आपल्या महाराष्ट्रात ह्यादिवशी स्त्रिया आपल्या पतीला पतीला तसेच माहेरच्या व सासरच्या पुरुष मंडळींना ओवाळतात घरोघरी प्रातः काळी किंवा सायंकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर पाटाबोहोती रांगोळी काढली जाते. पत्नी पाटील औक्षान करते आणि पती पत्नीला ओवाळणी घालतो. जी नवविवाहित दापंत्य असतात त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी होते. ह्यालाच दिवाळसण असेहि म्हणतात त्यानिमित्त ह्या दिवशी जावयाला आहेर करण्याची प्रथा महाराष्ट्रात अनेक भागात आहे.
उत्तर भारतात ह्या दिवशी गोवर्धन पूजा असते. कृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या देवळात हि पूजा संपन्न होते. भगवान श्री कृष्णांना अन्नपक्वानांचा डोंगर नैवेद्य म्हणून दाखवला जातो म्हणून ह्याला अन्नकुट असेदेखील म्हणतात दिवाळीतील पाडवा हा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त अर्थीक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरवात मानतात.
लक्ष्मीपूजन करून नवीन प्रारंभ मानला जातो त्यांच्या जमाखर्चाच्या खातेवणीच्या नवीन वह्या सुरवात होतात. त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा केली जाते. खर तर बळी राजा हा खूप दानशूर होता तो जे मागेल ते दान देत असे दान देणे हा एक चांगला गुण आहे , परंतु गुणांचा अतिरेक देखील दोषरच असतो कोणाला काय दान द्याचे किती व केव्हा द्यावे ह्याच धर्मशास्त्रात सांगितले आहे. दान देताना सतपत्री द्यावे अपात्री देऊ नये. कारण अपात्र माणसाच्या हातात जेव्हा संपत्ती लागते तेव्हा हा माणूस मनाला वाटेल असे अधार्मिक वागू लागतो.
बळीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे तेव्हा वामन विष्णूंनी बटू अवतार घेतला आणि ह्या वामनाने बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितली तेव्हा बळीराजकडे त्यांनी त्रिपादभूमी चे दान मागितले. त्रिपाद भूमी म्हणजे तीन पावले इतकी जमीन, वामन कोण आहे आणि हे दान का मागत आहे ह्याबद्दल माहित नसल्यामुळे त्रिपादभूमी दान देण्याचे राजाने मान्य केले त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण केले आणि एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतरिक्ष व्यापले आणि आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे त्यांनी बळीराजाला विचारले.
तेव्हा बळीराजाने आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवण्यास सांगितले बळीराजच्या मस्तकावर ठेवून त्याने त्याला पाताळात धाडले. आणि धाडण्यापूर्वी त्याला वर सुद्धा मागितण्यास सांगितले विचारले कि तुझी काय इच्छा आहे का. त्यावेळी बळीराजाने मागितले कि आता पृथ्वीतलावर माझे संपूर्ण राज्य संपणार आहे आणि मी पाताळात जाणार आहे तेव्हा तीन पाऊले टाकण्याचे जे काही घडले हे पृथ्वीवरती ओळखले जावे प्रभू यम दीपदान करणाऱ्याला यातना होऊ नये आणि त्याला अकाल मृत्यू येऊ नये आनी त्याच्या घरी सदैव माता लक्ष्मीचा वास राहावा.
आणि मग हेच ते तीन दिवस ह्या दिवसांना बळीचे राज्य असे मानण्यात येते. आता ह्या बलिप्रतिपदा साजरी पूजन कसे केले जाते, तर ह्या पूजेस पंचरंगानी रांगोळी काढली जाते. ह्या रांगोळीत बळी आणि त्यांची बायको विंद्यावली ह्यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. आणि हि पूजा झाल्यानंतर दीपदान किंवा वस्त्रदान केले जाते. बळीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्य राजा संपुष्ट होतो, अशी धारणा आहे.
आणि वस्त्रदान केल्याने त्याच्या घरात नेहमी भरभराट राहते माता लक्ष्मी त्याच्या घरात राहते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




