घरगुती उपाय

मंगळवारी करा हा एक उपाय, गुळाच्या डब्यावर लिहा हे अंक.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो जर ग्रहांची स्तिथी योग्य नसेल, किंवा कुंडलीतील मंगळ ग्रहाची अशुभ स्थानी असेल किंवा त्याची युती अशुभ ग्रहबरोबर झालेली असेल तर अश्या वेळी माणसाची चिडचिड वाढते. कामे होता होता बिघडतात, मालमतेच्या वादविवादात लोक फसतात. घरातील विवाहयोग्य मुले असतील तर त्यांचे लग्न लांबतात. पतिपत्नींमध्ये वादविवाद होतात एकमेकांसोबत पटत नाही.

मित्रांनो मंगळवारचा संबंध डायरेक्ट मंगळ ग्रहाशी आहे म्हणूनच आजच्या लेखात आपण मंगळवारी करावयाचा एक ज्योतिषी उपाय. अंकशास्त्र, तंत्रमंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र ह्या प्रेत्येक शास्त्रात हा उपायाचे वर्णन केले गेले आहे. मित्रांनो मंगळवार आणि रविवारी ह्या दिवशी आपण एक गुळाचा खडा आपण अवश्य खा आणि त्यावर आपण पाणी प्या, ह्यामुळे आपल्याला मंगळ ग्रह शुभ फळे देऊ लागतो.

गुळाचा थेट संबंध मंगळाशी आहे आणि त्याचा संबंध सूर्याशी देखील जोडला जातो. म्हणून समाजात प्रतिष्ठा मानसम्मानसाठी गुळाचा खडा आपण नक्की ग्रहण करा. आपल्या घरी जे पाहुणे येतील त्यांनासुद्धा आपण गूळ पाणी देतो हि तर खूप आधीपासून आलेली परंपरा आहे तीच आपण सुरु ठेवायची आहे. ज्या मुली आपल्या घरातून विवाह करून गेल्या आहेत अश्या मुलींना दान देताना सुद्धा आपण गुळाची ढेप आपण अवश्य द्या.

मंगळवारी किंवा शनिवारी घरसमोर आलेल्या भिक्षुकाला आपण गुळाचे दान करा, मित्रांनो हे छोटे छोटे उपाय आपले नशीब आपले भाग्य बदलवतात. आपली जी काही कामे आहेत ती कामे सोपी बनवतात. मित्रांनो आपल्या घरातील गूळ हा असा पदार्थ जो तुम्ही घरात कधीही संपू देऊ नये. ह्या गुळाने लक्ष्मी प्रसन्न राहते घरात वास करते. मित्रांनो गूळ हा नेहमी पितळी डब्यात ठेवावा कारण त्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील.

आपल्याला शक्य नसेल तर स्टील च्या डब्यात आपण तो ठेवावा मात्र आपण गूळ प्लास्टिक च्या डब्यात चुकनही ठेवू नये. आजच्या उपायात आपण एक असा अंक लिहणार आहोत ज्याची माहिती अंकशास्त्रात वर्णिली आहे. हा अंक आहे तो म्हणजे ९, हा अंक आपल्याला गुळाचा जो डबा आहे त्याच्या आतील बाजूला बुडाला आपण तो लिहायचा आहे. एक सफेद रंगाचा कागद घेऊन त्यावर लाल रंगाच्या शाईने आपण नऊ हा अंक आपण लिहायचा आहे. आणि तो असा आतल्या बाजूने ठेवायचा आहे कि जेणेकरून तो तुम्हाला दिसेल.

हे पण वाचा :-  घरगुती उपाय, सर्दी, शिंका, वाहणारे नाक थांबेल तेही एक मिनीटात.

नऊ हा अंक लिहून आपण त्यावर हा गूळ ठेवायचा आहे. मित्रांनो नऊ हा अंक व गूळ हे दोन्ही देखील मंगळास प्रसन्न करणारा आहे तसेच हा उपाय आपण मंगळवारी करत आहोत, तसेच मंगळाची दिशा आहे दक्षिण म्हणून तुम्ही हा डबा आपण दक्षिणेकडे ठेवायचा आहे. मित्रांनो प्रेत्येक शास्त्राच्या अनुसार हा उपाय खूपच प्रभावशाली आहे. पंरतु मित्रांनो एक काळजी मात्र नक्की घ्या कि हा गूळ कधीही संपून देऊ नका.

त्या गुळाचा वापर करा संपत आल्यावर नवीन आणून ठेवा, ह्यामुळे आपल्यावर लक्ष्मी देखील प्रसन्न राहील तसेच तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी देखील सर्व दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.