घरगुती उपाय

हे ८ घरगुती उपाय करून करा रांजणवाडी दूर घराच्या घरी.

नमस्कार मित्रांनो कॉफी विथ स्टोरीस ह्या आमच्या वेबसाइट वरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत रांजणवाडी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय.

रांजणवाडी का होते?

डोळ्यांवरती फुंगशी होणे म्हणजेच रांजणवाडी हा एक बॅक्टरीअल आजार आहे, ह्या रांजणवाडी आल्यानंतर आपल्या डोळ्यांना सूज येते, डोळे लाल होतात, डोळ्यांना खाज येते, डोळ्यांच्या पापण्यांच्या कापऱ्यावर हि येते. कधी कधी पाण्यांच्या ऑइल ग्लॅण्डस ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळेही असे होऊ शकते.

ह्यासाठी सायफिलोकॉर्स बॅक्टरीया जबाबदार असतो. जे लोक नेहमी स्ट्रेस ताणतणाव घेतात, ज्यांच्या मध्ये हार्मोनल बॅलन्स नसतो, ज्यांना डायबीटीज असतो तसेच ज्यांना कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असते, त्यांना हि समस्या होते. तर हि रांजणवाडी दूर करण्याचे काही सोपे उपाय आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

रांजणवाडी दूर करण्यासाठी काहि घरगुती उपाय.

पहिला जो उपाय आहे तो म्हणजे शेकणे, ह्यसाठी आपण कॉटनचा कपडा घेऊन तो आपण गरम पाण्यात बुडवून तो आपण आपल्या डोळ्यांवरती ठेवायचा आहे, साधारणपणे आपण ते ५ मिनटे तसेच ठेवावा, असे आपण दिवसातून ३ ते ४ वेळा करायचे आहे.

दुसरा उपाय म्हणजे ग्रीन टी बॅग, हि आपण गरम पाण्यात ठेवून आपण ती बॅग डोळ्यावर ठेवून शेकावे. तिसरा उपाय आहे तो म्हणजे धने, आपण एक कप गरम पाण्यात एक चमचा धने उकळून थंड करा त्यानंतर आपण ह्या पाण्याने डोळे धुवावेत दिवसातून दोनदा आपण हा उपाय करावा, सकाळी व संध्यकाळी करावा.

चौथा जो उपाय आहे तो म्हणजे हळद, २ कप गरम पाण्यात आपण एक चमचा हळद मिसळून हे पाणी आपण उकळून गार करून घ्याचे आहे. त्यानंतर गार झाल्यानंतर आपण दिवसातून तीनदा ह्या पाण्याने डोळे धुवायचे आहेत.

पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे बेबी शाम्पू, एक कप पाण्यात बेबी शाम्पू चे काही थेम्ब टाका व नंतर त्यात कपडा बुडवून त्या कपड्याने आपण आपले डोळे स्वच्छ पुसून घ्याचे आहेत. ह्यानंतर आपण आपल्या पापण्या कोमट पाण्याने धुवून घ्याच्या आहेत.

सहावा उपाय आहे तो म्हणजे एलोवेरा जेल, डोळ्यांवर आपण साधारणपणे २० मिनटे हे एलोवेरा जेल लावून ठेवायचे आहे त्यानंतर आपण आपले डोळे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहेत.

सातवा जो उपाय आहे ते म्हणजे पेरूची पाने, पेरूची पाने आपण धुवून घ्याची आहेत. कोमट पाण्यात रुमाल भिजवा त्यात हि पेरूची पाने ठेवून त्याने आपले डोळे शेकावेत. आठवा जो उपाय आहे तो म्हणजे बटाटे, बटाटे सोलून आपण कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. हे १० मिनटे डोळ्यांवर ठेवा. असे दिवसातून तीन वेळा करावे.

तर ह्या होत्या रांजणवाडी घालवण्यासाठी काही घरगुती उपाय. तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा लेख आवडला असेल तर तो नक्की जास्तीत जास्त लोकांना शेयर करा. तसेच तुम्हाला आणखी काही घरगुती उपाय माहिती असतील तर ते देखील तुम्ही आम्हाला कंमेंट करून कळवा.

टीप:-  ह्या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट