लाईफस्टाईल

सकाळी उठल्याबरोबर करा हे एक काम, घरात लक्ष्मी स्थायी वास करेल.

सर्वाना नमस्कार, मित्रांनो रात्री झोपताना तांब्याभर पाणी आपल्या देवघराजवळ आपण नक्की ठेवा हे पाणी तांबे धातूपासून बनलेल्या ताब्यात ठेवावे. रात्रभर हे पाणी तसेच असेल आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा मुख्य जो दरवाजा आहे कि ज्या ठिकाणी घराचा उंभरठा असतो त्या ठिकाणी हे पाणी आपण शिंपडावे सोबतच आपण आपल्या घराच्या दारासमोर घराच्या अंगणात हे पाणी आपण शिंपडू शकतात. ज्यांचा घरात गंगाजल असेल त्यांनी ह्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून ठेवावे व त्याच पाण्याचा वापर आपण सकाळी पाणी शिंपडण्यासाठी करावा.

हिंदू धर्मशास्त्रेच्या मान्यतेनुसार हि एक मान्यता आहे कि ज्या घरात ह्या नियमाचे अनुकरण केले जाते दररोज ज्या घरात असे उंबरठयावर पाणी शिंपडले जाते त्या घरावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रहार करत नाहीत. कोणत्याही प्रकराची बाधा त्या घरातील व्यक्तींवर उध्दभवत नाही. सोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते, सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा देवी देवता, घरात वास करू लागतात, त्या घरात धनधान्यची कमतरता भासत नाही.

ज्या ज्या वेळी शुभ दिवस असतील जसे कि पौर्णिमा असेल किंवा पितरांना समर्पित अमावस्या असेल अश्या वेळी आपण सायंकाळी आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे आपण प्रज्वलित करावेत, ह्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येण्याचा मार्ग मोकळा होतो. अमावस्याला आपण जेव्हा पितरांच्या नावे जेव्हा दिवा पेटवतो तेव्हा पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.

उंबरठ्याच्या बाबतीत वास्तुशास्त्र असे मानते कि हा उंबरठा हा नेहमी स्वच्छ असावा, त्यावर अधून मधून शुभ दिनी आपण हळदीने लेपन करावे. फुटलेला तुटलेला उंबरठा घरात पैसा टिकू देत नाही, अश्या घरात देवीदेवतेचे आगमन होऊ देत नाही. जी घरात फरशी असते तिच्यापेक्षा थोडासा हा उंच असावा खूप उंच असलेला उंबरठा देखील अशुभ मानण्यात येतो. त्याच्या जवळ बूट चपला सोडणे किंवा त्यावर उभे राहणे अशुभ असते, हानिकारक मानण्यात येते.

ज्या घरातील लोक उंबरठयावरती बसून जेवण करतात त्या घरात अनेक प्रकारचे दोष उद्भवतात. मित्रांनो ह्या उंबरठ्याच्या बाबतीत आपण जर ह्या नियमांचे पालन कर आपण केले तर आपल्या घरात सुख समृद्धी नक्की येणार. आणखी एक गोष्ट लेखाच्या शेवटी सांगू इच्छितो ते म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील मीठ, हळद, पीठ आणि तांदूळ घरातून कधीही संपू देऊ नका ह्या गोष्टी धनधान्यांशी निगडित आहेत. आणि हळदीवर कोणाचीही नजर पडणार नाही अश्या ठिकाणी आपण हळद ठेवावी.

हळद ज्या घरात संपते त्या ठिकाणूहून लक्ष्मी निघून जाते. हळदीचा डबा नेहमी भरलेला ठेवावा. तर मित्रांनो ह्या काही गोष्टींचे पालन जर आपण केले तर आपल्या घरात सुख समृद्धी नक्की नांदेल.  मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही,धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट