नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि मासे खाताना माश्याचा एखादा काटा आपल्या घश्यात अडकला तर आपण ताबड्तोक काय करायला हवे. हा काटा काढण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो. मित्रांनो मासे हे अत्यंत आपल्या शरीरासाठी उपयुत्क असतात आणि त्याचे महत्वव तर आपण जाणतोच.
आजच्या लेखात आपण असेच मासे खात असताना त्यातील एखादा काटा आपल्या घश्यात अडकला तर आपण काय तात्कळ करायचे आहे ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्वात सोपा उपाय जो अगदी खूप पारंपरिक आहे जुने लोक वापरत असत तो म्हणजे आपण एक भाकरीचा तुकडा घ्याचा आहे आणि असे एक ते दोन घास जर आपण खाल्ले तर जो हा अडकलेला काटा आहे तो त्या भाकरीच्या घासाबरोबर तो पोटात निघून जातो.
मग आता तुम्ही विचाराल आत गेलेल्या काट्याचे काय तर मित्रांनो जो आत गेलेला काटा असतो तो आपल्या शरीरातील अंतरींद्रिये आहेत लहान आतडे मोठे आतडे त्यांना तो कोणत्याही प्रकराची हानी पोहचवू शकत नाही. कारण आपल्या जठरातील पाचक द्रव्ये असतात ते श्रवायला सुरु होतात.असा पाचकरस काट्याच्या तुकड्यांचे छोट्या छोट्या तुकड्यात करून टाकतो.
त्या काट्याच्या तुकड्याना तो मऊ बनवू शकतो म्हणजे तो आपल्या आतील आतड्याना काहीही इजा पोहचून देत नाही. हा उपाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तो माहिती नसेल लोक खूप घाबरून जातात. तर घाबरून न जाता आपण तो भाकरीचा तुकडा चावून त्यात लाळ मिक्स होऊन द्यात त्यानंतर आपण तो गिळायचा आहे असे २ ते ३ घास आपण खा तो तुकडा आपल्या शरीरातून निघून जाईल.
आपण जर समुद्रकिनारी राहत असाल किंवा आपल्याकडे भाकरी नसेल तर आपण त्याऐवजी आपण भात देखील खाऊ शकता. भात देखील चावून आपण त्याचा गोळा होऊन द्या व नंतर गिळा काटा निघून जाईल. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे केळी आपण ह्याचे २ ते ३ घास घ्या थोडासा मोठे घास घ्या असे घास खाल्याने काटा निघून जातो पोटात व आपली वेदनांपासून मुकतात होते.
चौथा उपाय आहे तो म्हणजे लिंबू आपण एक लिंबू घ्या तो कापून त्याचा रस चोखून प्या त्याचा रस आतमध्ये जाऊदे ह्या रसामुळे देखील हा अडकलेला काटा आहे तो आतमध्ये जाऊ शकतो. तर अश्या प्रकारे हे चार उपाय आपण सांगितले आहेत त्यापैकी आपण कोणतेही उपाय करा अगदी एकावेळी २ ते ३ उपाय एकत्र केले तरी चालतील काही देखील हानी होणार नाही. बरेच लोक काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्यात तुम्हाला घश्याला वेदना होण्याची शक्यता असते. म्हणून आपण शक्यतो आपण वरील दिलेलं उपाय वापरून पहा आपला काटा निघून जाईल.
जरी सर्व करून जर काटा निघाला नाही तर आपण ताबड्तोक (ent) कान नाक घसा तज्ञाला लगेच दाखवावे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




