धार्मिक

सर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या तारक मंत्रासोबत करा हा एक उपाय

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींची सेवा नक्की करत असाल. सेवा करताना तुम्ही तारक मंत्र म्हणत असालच. आणि तारक मंत्र म्हणत नसाल तर तो तुम्ही आजपासूनच दररोज म्हणायला सुरुवात करा.

स्वामींचा तारक मंत्र

कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. तारक मंत्र हा आपल्या स्वामींचा मंत्र जो कि आपल्याला सर्व संकटातून तारून नेहणारा आपल्या प्रेत्येक संकटातून वाचून नेणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे बोल आहेत.तुम्ही तारक मंत्र हा अवश्य घरात बोलायला हवा, आज आपण आजच्या लेखात ह्या तारक मंत्रासोबत करावयाचा सोपा एक उपाय जाणून घेणार आहोत. ह्यामुळे आपल्यावर स्वामींची कृपाआशीर्वाद आपल्यावर राहतो.

स्वामींचा तारक मंत्राचा उपाय

स्वामी आपले रक्षण करतात. चला जाणून घेउयात तो उपाय कोणता ते. जेव्हा तुम्ही बसून तारक मंत्र बोलता तेव्हा आपण आपल्या समोर आपण तांब्याचा ग्लास किंवा वाटी आपण भरून ठेवायची आहे. त्यानंतर आपण देवासमोर बसून आपण ११ वेळा किमान हा तारक मंत्र आपण म्हणायचा आहे.

तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तवेळा सुद्धा ह्या मंत्राचा जप आपण करू शकता. पण तो जप आपण मनापासून करायचा आहे. हा जप झाल्यानंतर आपण ते पाणी जे ठेवले होते ते आपण प्याचे आहे तसेच ते पाणी आपण घरातील सदस्यांना देखील द्याचे आहे. तसेच उरलेले पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील. सर्व घरातील समस्या आजारपण दूर होते.

घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहते. मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात, स्वामींच्या कृपेचा अनुभव हा स्वामीभक्ताला येतोच येतो. म्हणून तुम्हाला देखील स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याचा असेल तर घरात तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा, तुम्ही कोणत्याही प्रकराची समस्यांनी त्रासलेले असाल, आर्थिक समस्यांनी ग्रस्त असाल ह्या सर्व समस्या स्वामींवर सोडून द्या व स्वामीसेवा करा स्वामी सर्व काही नीट करतील. सर्व संकटातून बाहेर काढतील.

हे पण वाचा :-  घराबाहेर पडताना तोंडात ठेवा हि एक वस्तू , काम यशस्वी होईल.

असाह्य दुर्बल झालेल्या समाजाला स्वामींनी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला आहे. आज हा दिलासाच कित्येक स्वामीभक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रेत्येक्ष रूपात नसले तरी स्वामीकृपेने त्यांचे सानिध्य त्यांना भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी अनेक भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. स्वामींचा तारक मंत्र हा प्रेत्येक ताणतणाव ग्रासलेल्या व्यक्तीला तणाव नियंत्रणाचे धडे देतो.

तारक मंत्र मधील शब्द हे दिलासादायक आहेत, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना आपण तारक मंत्र म्हणण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आयुष्यातील ताणतणव कायमचा निघून जाईल, व जीवन सुखमय बनेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.