लाईफस्टाईल

बुधवारच्या दिवशी चुकूनही करू नका हि कामे, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. बुधवार हा प्रथमेश गणपती बाप्पांचा वार मानण्यात येतो सोबतच बुधवार हा देवी दुर्गेचा वार देखील आहे. हिंदुधर्म शास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी काही कामे आपण चुकूनही करू नये. बुधवारचा स्वामी ग्रह हा बुध ग्रह आहे, बुध हा बुद्धीचा देवता आहे. हजरजबाबदारीपना, निर्णय क्षमता ह्या साठी बुध ग्रह ह्या बुधाचे प्रभुत्व आहे. आणि ह्याच बुधवारी आपण काही कामे चुकूनही करू नयेत. ती कामे कोणती हे आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेऊयात.

बुधवारी आपण उत्तर, पश्चिम दिशेस किंवा ईशान्य दिशेस यात्रा म्हणजेच प्रवास शक्यतो टाळावा विशेष करून बुधवारी ह्या दिशेला दिशाशूल असतो म्हणून ह्या दिशेला आपण प्रवास टाळावा अगदीच काही महत्वाचे काम असेल तर आपण अश्या वेळी थोडेसे तीळ किंवा धने खाऊन आपण ह्या दिशेला प्रवास करावा. ज्यांच्या कुंडलीत बुध अशुभ स्थानी आहे किंवा अशुभ फळे देत आहे अश्या वेळी अश्या लोकांनी शकयतो बुधवारी हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे.

बुधवारच्या दिवशी शक्यतो देवाणघेवाण पैस्यांचे मोठे व्यवहार शक्यतो करू नयेत, जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह अशुभ फळे देत असेल तर. जर आपल्या घरातील एखाद्या कन्येला वारंवार आरोग्य बिघडत असेल वारंवार ती आजारी पडत असेल तर अश्या वेळी तिच्या आईने बुधवारच्या दिवशी केस धुवू नयेत. ह्या दिवशी केस धुणे टाळावे. बुधवारी किंवा शुक्रवारी पुष्य नक्षत्र आले तर अश्या वेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.

अश्या वेळी आपण कोणतेही शुभ कार्य करू नये, बुधवारच्या दिवशी आपण घरातील कोणत्याही स्त्रीचा मग बहीण असेल, आत्या, मावशी, आई इत्यादी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका उलट आपण एखाद्या कन्येला काहीतरी भेट वस्तू आपण देऊ शकता. त्यामुळे बुध ग्रह आपल्यावर प्रसन्न होतो व आपल्याला चांगली फळे देऊ लागतो.

बुधवारच्या दिवशी दूध असे दूध कि जे जास्त वेळ उकळवले जाते दुधाचे काही असे पदार्थ जे दुधाला जाळून बनवले जातात जसे के खावा खीर अश्या वस्तूंचे सेवन आपण करू नका. बुधवारी आपण पान खाऊ नये, असे म्हणतात कि ह्या दिवशी पान खाल्याने आपल्याला आर्थिक संकटास सामोरे जावे लागते. बुधवारच्या दिवशी नवीन टूथब्रश असेल, नवीन कपडे किंवा नवीन चपला बूट असतील ते आपण चुकूनही खरेदी करू नयेत.

बुधवारच्या दिवशी नवीन कपडे परिधान करण्यास देखील आपल्या शास्त्रात मनाई केलेली आहे. ह्या दिवशी पुरुषांनी आपल्या सासरी जाणे टाळावे, तसेच आपल्या घरातील विवाहित महिलेला म्हणेजच आत्या असेल किंवा घरातील मुलगी असेल जी सासरी असेल तिला ह्या दिवशी आपण येण्याचे निमंत्रण देऊ नये. ह्या दिवशी आपल्याला एखादा किन्नर दिसला तर त्याचा अपमान न करता त्याला तुमच्या इच्छेने काही ना काही तरी दान म्हणून दक्षिणा द्यावी. ह्यामुळे बुध ग्रह शुभ फळे आपल्याला देऊ लागतो.

तर अश्या प्रकारे काही गोष्टी होत्या ज्या आपण बुधवारच्या दिवशी करणे कटाक्षाने टाळावे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट