मोबाइल चार्ज करताना करू नका या पाच चुका.
अर्थ

मोबाइल चार्ज करताना करू नका या पाच चुका.

सध्या प्रत्येकाच्या घरात मोबाइल झाले आहेत. असे कोणतेच घर नसेल त्या घरात मोबाइल नाही. हे युग डिजिटल झाले आहे. बऱ्याच गोष्टी या आता आपल्या हातात आल्या आहेत. खुप वर्षा पूर्वी “कर लो दुनिया मुठ्ठी में” अशी जाहिरात येत असे. पण हे शक्य होईल का हे कोणालाच कल्पेनेत नव्हत. पण पण आता हे जवळ पास शक्य झाले आहे.

प्रत्येक जण हा स्मार्ट फोन वापरत आहे. आणि त्या मध्ये सर्व प्रकारचे काम करता येते. जसे कि ई-मेल पाठवणे, गाणे ऐकणे, व्हिडिओ पाहणे या सर्वगोष्टी करतात येतात त्या सोबत आता ऑनलाईन तुम्हला घरातील किरण माल सुद्धा मागवता येतो, त्या सोबत इतर गरजेच्या वस्तू सुद्धा घर बसल्या मागवता येतात. या सर्व गोष्टी सहज रित्या करता येतात. ते सुद्धा एका फोन मधून.

मोबाईल चार्ज करताना या चुका करू नका

बाजारात विविध कंपन्यांचे मोबाइल आहेत. तसेच प्रत्येक मोबाइलची एक खासियत आहे. आणि त्या प्रमाणे त्याची किंमत सुद्धा ठरते. आपल्याला परवडणारे मोबाइल आपण घेऊन येतो. काही जण खुप काळजी सुद्धा घेतात मोबाइलची. मोबाइल खाली पडणार नाही, त्या वर कोणत्याही प्रकारचे डाग लागणार नाही, याची सुद्धा पण काळजी घेतो. पण आपण मोबाइल चार्ज करताना काही गोष्टींची काळजी घेतो का?.

मोबाइल चार्ज करताना अशा काही गोष्टी आहेत. त्या पण कधीही केल्या नाही पाहिजे. जेणेकरून मोबाइल बॅटरी जास्त काळ चागली राहील. सर्व जण मोबाइल योग्य ती काळजी घेतात पण मोबाइल बॅटरीची काळजी घेणारे खुप कमी लोक आहेत. मोबाइल चार्ज करताना आपण कोणती  काळजी घेली पाहिजे या बद्दल थोडी माहिती जणू घेऊ. ज्या मुळे आपल्या मोबाइलची बॅटरी जास्त काळ चागली कामगिरी (performance) करेल.

बऱ्याच जणांना एक समस्या असते ती म्हणजे काही दिवसात मोबाइल 100% पूर्ण चार्ज केल्या नंतर सुद्धा काही वेळात बॅटरी कमी (down) होण्यास सुरवात होते. आणि आपण हा मोबाईल खराब झाला आहे असे बोलतो. पण जर का आपण मोबाईल चार्ज करताना काही गोष्टीचे नियम पाळले तर बॅटरी आयुष्य (battery life) चागली रहाते.

या पाच चुका मोबाइल चार्ज करताना करू नका. पहिली गोष्ट ज्या वेळी तुम्ही मोबाइल चार्ज करत असतात. त्यावेळेस फोन ला असलेले कव्हर काढून ठेवत जा. या मागे कारण असे कि, बॅटरी चार्ज करताना काही प्रमाणात फोन गरम होत असतो आणि त्या वेळेस त्याला हवेचा थोडा पुरवठा लागत असतो. तोच त्या कव्हर मूळे बंद होतो. परिणामी बॅटरी खराब होतेच सोबत डिस्प्ले (display) सुद्धा काही प्रमाणात वीक होण्याची शक्यता असते.

दुसरा नियम कंपनीने मोबाईल सोबत जो चार्जेर दिला आहे तो वापरत जा. बरेच व्यक्ती एका वेगळ्या कंपनीचा मोबाईल आणि चार्जेर हा दुसऱ्या कंपनीचा असतो त्यामुळे त्या मोबाईल ला योग्य ती पॉवर मिळत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या मोबाईलची बॅटरी वीक होण्यास सुरवात होते. आणि काही दिवसात मोबाईलची बॅटरीचे आयुष्य (battery life) कमी होण्यास सुरवात होते. जर का आपले कंपनीने दिलेले चार्जेर खराब झाले असेल तर त्याच कंपनीचे चार्जेर मिळते. आणि शक्यतो तेच चार्जेर वापरावे.

मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य (battery life) वाढवण्यासाठी करा हे उपाय.

तिसरी गोष्ट अशी आहे. ज्या वेळेस मोबाईल चार्ज करत असाल तर तो जमत असेल तर बंद करून ठेवावा किंवा फ्लाइट मोड (flight mode) ठेवावा. कारण बरेच जण मोबाईल चार्ज करताना फोन वर बोलत असतात. काही जण चार्जिंगला लावून गेम खेळतात. यामुळे सुद्धा मोबाईलची बॅटरीचे आयुष्य (battery life) कमी होते. त्याच सोबत जास्त गरम होणे (overheating) सारख्या समस्या सुरु होतात. काही वेळेस मोबाईलचा स्फोट होणे या सारख्या गोष्टी सुद्धा होतात. त्यामुळे मोबाईल चार्ज करत असताना त्याचा वफर करू नये.

सर्वात महत्वाची चौथी गोष्ट. बऱ्याच लोकांना आपल्या मोबाईलची बॅटरी किती टक्के चार्ज करायची असते या बदल माहिती नसते. बरेच जण असे सुद्धा आहे, पूर्ण म्हणजे शंभर टक्के चार्ज झाल्यावर सुद्धा तसाच मोबाईल चार्जिंगला ठेवतात. पण शंभर टक्के पूर्ण झल्यावर अजून किती चार्ज होणार हे सुद्धा त्यांना समजत नाही. बऱ्याच कंपन्यांचे मोबाईल किती टक्के चार्ज केला पाहिजे याबद्दल माहिती त्यांनी त्याच्या मॅन्युअल पुस्तक (manual book) मध्ये दिलेली असते. शक्यतो 90% ते 98% पर्यंत चार्ज करावे.

पाचवी आणि शेवटची गोष्ट. काही व्यक्ती आपला मोबाईल हा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ला लावून चार्ज करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर का पण अशा पद्धतीने चार्ज केल्यास त्याला जी पवार हवी असते ती मिळणार नाही आणि कमी पवार मध्ये मोबाईल चार्ज केल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते. ज्या वेळेस आपल्याला मोबाईल मधला डेटा लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी युएसबी चा वापर करावा.

जर का आपण या नियमांचे पालन आपण केल्यास आपल्या मोबाईल ची बॅटरी चागल्या प्रकारे रहाते. त्याची कार्यक्षमता चागली राहते. जास्त काळ मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य (battery life) वाढते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

One Reply to “मोबाइल चार्ज करताना करू नका या पाच चुका.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट