प्रत्येक घरात पूजा होत असते. पूजा झाल्यावर सर्व देवांना फुले वाहिली जाते. फुले वहिल्यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. आणि देव पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला देवांच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला मिळून जाते. मात्र फुले वाहताना बऱ्याच चुका आपल्या हातून होतात आणि ते दोष आपल्या सोबत येत जातात.
बऱ्याच व्यक्तीना पूजा झाल्यावर फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजे याबद्दल थोडी सुद्धा कल्पना नसते. आपण पूजा झाल्यावर फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजे याबद्दल जाऊन घेऊ तसेच कोणती फुले कधी व कशी वाहिली पाहिजे याबद्दल सुद्धा जाऊन घेऊ. आपण पूजा हि मन एकाग्रता करून करतो पण छोट्याशा चुका मुळे आपल्याला त्या देवपूजेचे श्रय मिळत नाही.
काही जण देवीदेवताना काळ्या वाहतात हे सर्वात चुकीची गोष्ट आहे. कोणतेही फुल जोपर्यंत पुर्ण उमलत नाही तोपर्यंत देवाला फुल वाहूनये. मातीने खराब झालेली फुले देवी देवतांना चुकून सुद्धा वाहूनये. त्याच सोबत देवाला फुले अर्पण करण्याआधी वास घेतलेली फुले सुद्धा देवाला वाहूनये. तसेच किड लागलेली फुले सुद्धा देवाला अर्पण करुनये हि सर्व फुले अपवित्र मानली जातात.
फुले देवीदेवताना वहातांना उजव्या हातानी वाहावी तसेच फुले झाडांपासून तोडताना उजव्याच हातानी तोडावीत. त्याच सोबत अपवित्र जागी आलेली फुले कधीच देवाला वाहूनयेत. चोरून आणलेली फुले तसेच सुकलेली खराब झालेली फुले सुद्धा देवाला वाहूनये. हि फुले सुद्धा अपवित्र मानली जातात. काही विशिष्ट फुले हि विशिष्ट देवी देवतांना वहावीत.
काही अशी विशिष्ट फुले असतात ती चुकून सुद्ध विशिष्ट देवी देवतांना वाहूनये. जसेकी भगवान श्री हरी श्री विष्णूला धोत्रा, गोकर्ण, कोरांटी, कुडा, बेलाचे पान चुकून सुद्धा वाहू नयेत. पण भगवान विष्णूला तुळशीचे पान आणि कमळाचे फुल अति प्रिय आहे. भगवान महादेवाला बेलाचे पान, काम, पांढरी सुगंधित फुले अर्पण करावीत. तर तुळस, मका, मालती, कुंद इत्यादी फुले चुकून सुद्धा अर्पण करुनयेत.
तसेच जर तुम्ही गणपती मंदिरात जात असाल तर गणपतीला जास्वंद, शमीपत्रे, गुलाब, दुर्वा हे सर्व अर्पण करावे. तसेच देवीची पूजा करताना लालरंगाची फुलेस शकतोय अर्पण करावीत. त्याच सोबत देवीची ओटी अवश्य भरावी हि एक खुप मत्वाची गोष्ट आहे. फुले कशी वाहावी याबद्दल सुद्धा काही महत्वाच्या बाबी अवश्य जमजून घेऊ.
फुले वहातांना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत फुलाचे देठ हे नेहमी देवाकडे करून वहायचे असते. तसेच बेलाचे पण वाहताना उलटे करून वाहावे. तसेच दुर्वा वहातांना दुर्वाचा सर्वात वरचे टोक हे आपल्या कडे करून वाहावे. तसेच कोणत्याही देवी देवतांना फुले अर्पण करताना त्या देवाचे नाव घेऊन नमः असे बोलावे. तसेच फुले वहातांना अनामिक, अंगठा आणि मधले बोट या तीन बोटानी धरून वहावे.
हे पण वाचा :- तुम्हला माहीत आहे का KGF Chapter २ चा हिरो यश ची खरी गोष्ट.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




