लाईफस्टाईल

श्रावणात महिलांनी ह्या रंगाची साडी चुकूनही घालू नका.

श्रावण महिना हा खूपच पवित्र व अध्यात्मिक महिना मानला जातो ह्या महिन्यात व्रत उपासना पूजा केली जातात. अगदी भक्तिभावाने सर्व भक्त हे पूजा करतात. श्रावण महिन्यात सुवासिनी महिलांनी काही गोष्टी लक्षात घेऊन त्या टाळायच्या आहेत तर काही गोष्टी करणे देखील मह्त्वाचे असते. सुवासिनी महिलांनी माता पार्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ह्याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यात विवाहीत महिलांनी माता पार्वतीची पूजा नक्की करावी त्यामुळे सौभाग्याचे दान मिळते. सोमवारच्या दिवशी माता पार्वतीचे पूजन करून माता पार्वतीला लाल फुले, कुंकू हा सर्व अर्पण करावे, जर तुम्हाला जास्वंदीची फुले प्राप्त झाली तर मात्र तुम्ही ती फुले आई अंबिकेला नक्की अर्पण करावीत त्याचबरोबर आई भगवतीला कुंकू लावल्यानंतर आपण ते स्वतःला देखील लावून घ्याचे आहे त्यामुळे आपले सौभाग्य अबाधीत राहते.

श्रावण महिन्यात सर्वत्र निसर्ग हिरवागार दिसतो असे मानले जाते कि शंकर माता पार्वतीला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले होते आणि त्यावेळी पृथ्वीने सर्वत्र हिरवा रंग पसरवला होता. म्हणजेच निसर्ग हिरवा गार झाला होता त्यांच्या स्वागतासाठी. त्यामुळे श्रावण महिन्यात विवाहित स्त्रियांनी हिरवी वस्त्रे परिधान करावीत. हिरवा रंग ह्यावर्षी खूपच शुभ मानला जातो. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे त्यांचे आपल्या पतीसोबतचे संबंध दृढ होतात.

श्रावण महिन्यात विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र कायम गळ्यात ठेवावे तसेच ते तुटलेले देखील नसावे. हिरव्या रंगाचा हार गळ्यात घातला तर अति उत्तम. श्रावण महिन्यात स्त्रियांनी कधीही आपला गळा रिकामा ठेवू नये. ह्या महिन्यात स्त्रियांनी काळे वस्त्र परिधान करू नयेत. काळे वस्त्र नाकारात्मक ऊर्जा आकर्षति करतात त्यामुळे काळे वस्त्र चुकूनही घालू नये.

महादेवांची पूजा करण्यासाठी आपण पांढऱ्या रंगाची साडी आपण घालू शकता. हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान केले तरी चालेल मात्र आपण काळ्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही परिधान करू नका. तर मित्रांनो आजचा लेख तुम्हाला आवडला असेलच लेखाला लाइक व शेयर करण्यास विसरू नका, धन्यवाद

हे पण वाचा :-  असे मंगळसूत्र चुकूनही घालू नये होऊ शकतो अनर्थ.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.