नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपले दुकान असेल, उद्योग असेल, व्यासाय आहे, बिझनेस आहे दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, भांडवल आहे परंतु व्यवसाय उद्योग काही व्यवस्थित चालत नाही. बिझनेस मध्ये यश मिळत नाही तर ह्यामागे भरपूर कारणे असू शकतात पहिली गोष्ट ज्या वास्तूमध्ये आपले दुकान बिझनेस आहे त्या वास्तूत काही दोष असू शकतात.
दुसरी गोष्ट जी व्यक्ती उद्योगधंदा चालवते त्याच्या पत्रिकेत दूषित ग्रहांची महादशा असू शकते अश्या काही कारणास्तव किंवा काही गुप्त शत्रू असतात काही लोकांची आपल्या दुकानाला नजर लागलेली असते अश्या सर्व कारणास्तव आपले दुकान व्यवस्थित चालत नसेल.
तर ह्या वर उपाय आहेत जे आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत आपल्याला जितक्या गोष्टींचे पालन करता येईल तितक्या गोष्टींचे पालन आपण करायचे आहे. आपल्याला काही दिवसातच दिसून येईल कि आपला उद्योगधंद्यात भरभराट होत आहे. मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या दुकानात माता लक्ष्मीची अशी तस्वीर ठेवा ज्या मध्ये माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेले हत्ती उभे आहेत.
आणि हा माता लक्ष्मी ह्या कमळावरती बसलेल्या असाव्यात. मित्रांनो ह्या प्रतिमेस गजांतवैभवलक्ष्मी असे म्हणतात हे माता लक्ष्मीचे एक रूप आहे. हा फोटो आपण आपल्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी स्थापित केल्याने आपल्या दुकानाची भरभराट होते आणि महत्वाची गोष्ट आपण ती माता लक्ष्मीचा फोटो स्थापन केल्यानंतर आपण त्याची दररोज पूजा करावी म्हणजे दिवा, अगरबत्ती लावावी आणि कमीत कमी मंगळवारी व शुक्रवारी गोड नैवैद्य दाखवावा.
मित्रांनो आपल्या दुकानात काही अडगळीचे सामान असेल तर ते लगेच तिथून काढून टाका तसेच आपले जे प्रवेशद्वार आहे त्याच्या चौकटीवर स्वस्तिकचे चिन्ह अवश्य रेखाटा. ह्या स्वस्तिकमध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो म्हणून हे आपण आपल्या चौकटीच्या दोन्ही बाजूस काढून त्याच्या बाजूला दोन उभ्या दांडका काढण्यास विसरू नका. आपले दुकानाची प्रगती होईल
वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण एक चिनी मातीचे भांडे असते त्या भांड्यात त्या बरणीत,आपण साधारणपणे एक पाव किलो तुरटी ठेवूनि ती बरणी आपण आपल्या दुकानाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात ठेवून द्याचे आहे. ह्या तुरटीचा कोणाचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी आपण अवश्य घ्या. आणि हो हि तुरटी आपण प्रेत्येक महिन्याला बदलत चला. जुनी तुरटी वाहत्या पाण्यात सोडून द्या. ह्यामुळे आपल्या उद्योगधंद्याला लागलेली नजर सोबतच आपल्या त्या दुकानातील वास्तुदोष देखील दूर होतात.
ज्यांचे दुकान धातूसंबधी आहे त्यांनी शनिवारी आपल्या दुकानात आलेल्या मागतकऱ्याला माघारी ना पाठवता काही तरी दान करावे. तसेच ज्यांचा व्यवसाय चैनीच्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक्स संबंधी असतील त्यांनी पण हेच पण फक्त आपण शुक्रवारच्या दिवशी दान करावे कोणालाही मोकळे हात पाठवू नये. खाण्यापिण्याच्या संबधी ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी एक माळ ह्या मंत्राचा जप करावा मंत्र आहे “ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमो भगवती माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा ।” हा जप १०८ वेळा केल्याने कोणताही खाद्यान्नाचा व्यवसाय असुदे किराणा मालाचा व्यसाया अतिशय चांगल्या पद्धतीने चालू लागतो.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




