फूड

बटाटा खाणारे सर्वानी आजचा लेख अवश्य वाचावा.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती खूप स्वागत. मित्रांनो आजच्या लेखात आपण बटाट्याबाबत एकदम महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीसुद्धा एकदम बटाटे घेऊन घरात साठवणीला ठेवत असाल तर आजचा लेख आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जगभरात अश्या काही गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे बटाटा खाल्यानंतर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. हे नेमका कसा झाला ह्यामागे कारणे काय ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जेव्हा बटाटे साठवले जातात तेव्हा त्याला काही दिवसातच कोंब येतात. हे हिरवे कोंब सोल्यानाईन आणि चकोनाईन ह्या दोन विषारी तत्वांनी युक्त असतात. ह्या दोन प्रकारचे विष ह्या कोंबत तयार झालेलं असते जरी आपण हे कोंब काढून टाकले आणि त्या बटाट्याची भाजी केली तरीसुद्धा आपल्याला विषबाधा होऊ शकते. अनेकदा असे होते काहींना डोकेदुखी, मळमळणे, पोटदुखी, उलटी होणे, जुलाब लागणे अश्या प्रकारची विषबाधेची लक्षणे त्यांच्यात दिसतात. लक्षणे खूप तीव्र स्वरूपात असतील तर मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता असते.

आपण काळजी म्हणून नेहमी लक्षात ठेवा कि बटाट्याच्या जे रोपटे आहे त्याच्या पानांमध्ये, डोळा आहे जे कोंब असतात ह्या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी तत्वे आढळून येतात. जर हि अश्या प्रकारची बटाटे ज्यांना कोंब आहेत ह्यांना कडक उन्हात साठवले किंवा कमी तापमानात साठवले तर त्यात ग्लयको अल्कोल्यडस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मग आपण जर अशे बटाटे मोठ्या तापमानात वाळवले, उकडले, फ्राय केले तेलात तळले तरीसुद्धा ह्या विषारी तत्वांवर कोणताही फरक पडत नाही.

ह्यावरती एक साधा उपाय म्हणजे बटाट्याला कोंब आलेले असतील तर हे बटाटेच ताबड्तोक फेकून द्या. बटाट्याच्या सालीत देखील काही वेळा हि विषारी तत्वे आढळतात म्हणून नेहमी बटाटे उकडण्याआधी बटाट्याची साल काढून ते उकडावेत. ह्या विषबाधेची काही लक्षणे तुम्हाला कधी दिसतील ती काही वेळात निवळतील सुद्धा. काही तासात तुम्ही बरे होऊन जाल, पंरतु काही वेळा हि हि लक्षणे तीव्र असतील तेव्हा वैद्यकीय सल्ला लगेच अवश्य घ्या.

हे पण वाचा :-  रोगा पासून मुक्ता मिळणार चहा. पोटाचे आजार कमी करतो, पचन क्रिया नीट होते.

गृहणींसाठी एक महत्वाची टीप जास्त प्रमाणात बटाटे खरेदी करू नका, लागतील असे बटाटे खरेदी करून त्यांचा वापर करा आणि आणखी एक महत्वाची टीप म्हणजे बटाटे व कांदे एकत्रित साठवू नका. कारण हे एकत्रित साठवल्याने त्याला कोंब येण्याची प्रक्रिया लवकर होते. व बटाटे लवकर खराब होतात.

आपण बबटाट्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात साठवलेले असतील काही कारणास्तव तर त्या खोलीत जाताना दरवाजे खिडक्या पूर्णतः उघडा कारण त्यातील सडलेल्या बटाट्यातून एक वायू निघतो तो एकदम विषारी असतो व त्याचा दुष्परिणाम आपल्यावरती होऊ शकतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.