घरगुती उपाय

रवा, बेसनपीठ, मैदा, पिठाला कीड लागणार नाही, फक्त हे एक पान वर्षभर पीठ खराब होणार नाहीत.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आपल्या घरात देखील मैदा, रवा, बेसन पीठ किंवा वेगवेगळ्या धान्यांची पीठे जसे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासारखी पीठे असतात आणि ह्या पिठांना कीड लागण्याची समस्या उदभवत असते खासकरून पावसाळा ऋतू सुरु होण्याआधी हि ईद लागण्याची समस्या उद्भवते, आणि पावसाळ्यात सुद्धा ओलावा निर्माण होऊन हे पदार्थ खराब होण्याची समस्या देखील असते.

ज्या गृहिणींना हि समस्या उद्भवते त्यांच्यासाठी खास आजचा आपला लेख आहे. हा एकच उपाय करा पिठाला कधीही कीड लागणार नाही. तर ह्यसाठी आपण काय वापरणार आहे. तर पहिला जो उपाय आहे त्यात कडुनिंबाचे आणि तेज पान आपण वापरणार आहोत. ह्या पैकी एक पान आपण रवा, मैदा, बेसन पीठ आपले जे पण पीठ असेल त्या डब्यात हे एक पण ठेवायचे आहे. त्या पिठाला कधीही कीड लागत नाही.

ह्या पिठाचे कीटकांपासून संरक्षण होतेच परंतु आणखी आजकालच्या ह्या पावसाळी वातावरणामुळे जी काही आद्रता असते ती आद्रता देखील हे एक पान ठेवल्याने राहत नाही. म्हणजे ओलाव्यापासून त्याचे संरक्षण होते आणि ते पीठ जास्त काळ टिकते. दुसरा उपाय जो आहे त्यामध्ये आपण वापरणार आहोत पुदिन्याची पाने. आता पुदिना आपण वापरत असतो बाजरात हि सहज उपलब्ध देखील होते. तर ह्या पुदिन्याचे एक पान आपण आपले पीठ ज्या डब्यात ठेवले आहे त्या डब्यात ठेवायचे आहे. आणि जे किड्यापासून नुकसान होते त्यापासून वाचा.

ह्या पुदिनाच्या वासाने त्याला कीड लागत नाही, कोणत्याही प्रकारची कीटक आहेत ते येत नाहीत. म्हणून ते पीठ आहे ते जास्त काळ टिकते. आपली जी पीठे आहेत मैदा असेल, रवा असेल, बेसन पीठ धान्याची पीठे हि आपल्या घरात असतातच फक्त त्यांना कीड लागू नये म्हणून हे उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे. ह्यासाठी तुम्ही हवाबंद डबे वापरू शकता किंवा तुम्ही फ्रीझ मध्ये देखील हि पीठे ठेवू शकता. असे केल्याने ते बऱ्याच काळ टिकून राहते आणि त्याला कीड देखील लागत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट