धार्मिक

फक्त ह्या ७ वास्तू टिप्स पाळा, घरात पैसा व सुख दोन्ही येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखामध्ये वास्तुशास्त्रामधील अश्या काही टिप्स आपण पाहणारा आहोत जेणेकरून आपल्या घरातील वातावरण नेहमी पॉसिटीव्ह राहील साकारत्मकता आपल्या घरामध्ये कायम राहील. आणि ज्या घरामध्ये सकारात्मकता असते त्या घराकडे लक्ष्मी माता आपोआप येते. त्या घरात सुख शांती आणि धन ह्या गोष्टी नेहमी वास करतात.

पहिली टीप म्हणजे आपल्या घरातील सर्व लोकांचा एकत्र फोटो ज्यामध्ये सर्वजण आनंदी व हसतमुख आहे असा फोटो तुम्ही घरात ज्या खोलीमध्ये तुम्ही सर्वात जास्त उठता बसता त्या खोलीमध्ये हा फोटो लावा. अश्याने मोठ्यात मोठ्या वास्तू समस्या तर दूर होतातच तसेच घरातील लोकांचे एकमेकांप्रती प्रेम वाढीस लागते. मित्रांनो हा अत्यंत साधा सोपा व अत्यंत प्रभावी असा उपाय जे केल्याने घरात आनंद वातावरण निर्माण होईलच तसेच आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. दुसरी वस्तू टीप म्हणजे आपण देवघरात आपण दररोज देवपूजा करत असतो त्याच बरोबर आपण दिवा हि प्रज्वलित करत असतो. ही देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या देवघरातील घंटी नक्की वाजवत जा कारण वास्तुशास्त्रानुसार देवपूजा करत असताना हि घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते. तसेच घरातील वास्तुदोष देखील दूर होतात आणि घरातील पवित्रता वाढीस लागते आणि हीच पवित्रता धनाच्या आगमनाचे नवनवीन योग निर्माण करते.

तिसरी वस्तू टीप म्हणजे आपल्या घराच्या आसपास संत्र्याच झाड नक्की लावा कारण हे संत्र्याच झाड वास्तुशास्रानुसार आपल्या घराच्या सोभवतालची नाकारात्मक ऊर्जा दूर करते आणि धनवृद्धीच कारक देखील बनते. अशी हि मान्यता आहे कि ह्या झाडातून पडणारी ऊर्जा हि घरामध्ये नवनवीन धनप्राप्तीचे योग निर्माण करते, पैस्याची चणचण कधीच भासत नाही. चौथी वस्तू टीप आहे की आपल्या घरामध्ये सायंकाळ होताच घराबाहेरील दिवे नक्की प्रज्वलित करावेत कारण ह्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि अश्या वेळी जर आपल्या घरी अंधार असेल तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश न करताच ती पुढे निघून जाते. तुमच्या घराबाहेर फुलांचे तोरण लावलेले असेल किंवा देवघरात वाहिलेली फुले सुकलेली असतील तर ती वेळच्या वेळी दूर करत चला कारण हि सुकलेली फुले हि नकारात्मक ऊर्जेने भरलेली असतात. आपल्या प्रगतीमध्ये बाधा येत राहतात म्हणून वेळच्या वेळी अशी सुकलेली फुले दूर करावीत.

पाचवी वस्तू टीप खूप लोकांना सवय असते की खूप लोक आपल्या बेडरूम मध्ये जेवण करतात किंवा काही तरी खात असतात मित्रांनो अशी सवय जर आपल्याला देखील असेल तर आपल्या जीवनामध्ये अश्या सवयीमुळे आपल्या जीवनामध्ये, भाग्यामध्ये खूप मोठे वास्तुदोष निर्माण होतात. म्हणून आपल्या बेडरूम मध्ये बसून काहीही खाऊ नये.

सहावी वास्तू टीप आपले घरातील टॉयलेट जर पूर्व दिशेला असेल तर त्यामुळेदेखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतात म्हणून ह्यवर्ती उपाय आपण एक वाटीभर मीठ हे आपल्या टॉयलेट मध्ये ठवून द्या मात्र हि वाटी काचेची असावी ह्याची काळजी मात्र आपण घ्यावी.
सातवी वास्तू टीप आपण खूप कष्ट करत आहेत आणि तरी आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत नसेल तर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक पिवळ्या रंगाची लाइट बल्ब आपल्या घरबाहेर लावा तुम्हाला काही दिवसातच फरक दिसून येईल की तुमच्या जीवनामध्ये अनेक धनप्राप्तीच्या संधी चालून येतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

 

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट