घरगुती उपाय

कोणतीही हरवलेली वस्तू शोधा फक्त तीन दिवसांत करा हा एक उपाय.

मित्रांनो आपण खूप वेळा पैसे एका विशेष जागी ठेवतो मात्र नंतर आपण ते कुठे ठेवले होते ते आपल्या लक्षात येत नाही. आपले हरवलेले पैसे शोधण्यासाठी हा एक उपाय आपण आजच्या लेखात सांगत आहोत हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला कि आपल्याला अगदी चौथ्या दिवशी हरवलेली वस्तू मिळते. अगदी सर्वानी करून पाहण्यासारखा आहे.

मित्रांनो ह्या उपायासाठी काही साहित्य सामग्री लागेल, जसे कि तुमच्या घरात एखादा छोटासा कपडा पडला असेल तर त्याची आपण एक बाहुली करा. ती आपल्याला जमत नसेल तर बाजारातून एखादी कापडी बाहुली आपण विकत अनु शकता. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आघाडा ह्या वनस्पतीचे मूळ आपल्याला ह्या साठी लागते.

ह्या आघाड्यामुळे आपल्याला वस्तू कोठे आहे ह्याचे ज्ञान करून देते. तर त्या मुळाचा छोटासा तुकडा आपण घ्याचा आहे. त्यानंतर आपण त्या घेतलेल्या बाहुलीला आपण तो बांधायचा आहे, त्यानंतर आपली जी काही बैठक खोली आहे किंवा ज्या खोलीत तुम्ही जास्त वेळ घालवता त्या खोलीतील दक्षिण बाजूची जी भिंत आहे त्याठिकाणी आपण एक खिळा आपण ठोकायचा आहे.

खिळा ठोकल्यानंतर आपण हि बाहुली त्या खिळ्याला बांधायची आहे, हि जे काम आहे खिळा ठोकून त्याला बाहुली बांधायची आहे ते आपण रात्रीच्या वेळी करणार आहोत. ह्या बांधलेल्या बाहुलीला आघाड्याची मुळी बांधलेली आहे, अश्या ह्या बाहुलीकडे आपण एकाग्र चित्ताने पाहत राहायचे आहे. आपल्या शेजारी कुणीही नसावे ह्याची आपण काळजी घ्यावी.

एकाग्र पाहत असताना आपल्याला ती बाहुली थोड्या वेळानी पुसटशी दिसेल त्यावेळी आपण एक मंत्र आहे तो बोलायचा आहे, ओम नमो कार्तिकाय ह्या मंत्राचा तुम्हाला जितका वेळ जप करणे शक्य आहे तितका वेळ जप करावा. हा जप करून झाल्यानंतर आपली साधना संपली, आता हि झाली पहिल्या दिवसाची गोष्ट दुसऱ्या दिवशी देखील आपण हेच करायचे आहे. हे सगळे काम आपण रात्रीच्या वेळी करायचे आहे, तिसऱ्या दिवशी देखील आपण हेच काम करायचे आहे.

चौथ्या दिवशी मात्र आपल्याला काहीही करायची गरज लागणार नाही, तुम्हाला तुमची हरवलेली वस्तू तुमच्यकडे येते. ह्या ना त्या मार्गाने त्या वस्तूची आणि तुमची भेट झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो आपण जे काही उपाय सांगतो आहे ते आपण करत असाल तर त्याची वाच्यता आपण कुठेही करू नये. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट