Always keep these luck shining things in the house
वास्तू शास्त्र

नशीब चागले होण्यासाठी घरात नेहमी ठेवा या पाच वस्तू.

आपण आज अशा काही वस्तू पहाणार आहोत त्या घरात ठेवल्याने आपल्या घराची शोभा वाढेल आणि आपल्या त्याचा लाभ सुद्धा मिळेल. अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या घरात ठेवल्यावर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. बऱ्याच जणांना असे वाटत असेल कि आपण या वस्तू आधी पासून घरात ठेवत आलो आहोत. तरी याच लाभ आपल्या कधी जाला नाही.

पण एक गोष्ट लक्षात असुद्या वस्तू घरात आणून ठेवणे आणि त्याच्या पासून लाभ मिळण्यासाठी काही नियमांचा वापर करण्याची गरज आहे. अशा काही वस्तू आहे. त्या आपण घरात आणल्यावर त्यांच्या जागा ठरून ठेवल्या आहेत. किंवा त्या वस्तू त्याच दिशेला आणि जगेवर ठेवल्या तरच त्याचा फायदा आपल्याला मिळत असतो. आपल्या घरात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त होत जातो.

यामुळे अशा काही वस्तू आहेत त्या शक्यतो आपल्या घरात नक्की असाव्यात. त्यातील पहिली वस्तू म्हणजे पाण्याचा धबधबा आपण त्याला water fountain सुद्धा म्हणतो. water fountain मुळे आपल्या घरात पाण्याचा आवाज सारखा ऐकू येईल. या आवाजामुळे आपल्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. हा water fountain शक्यतो उत्तर दिशा, ईशान्य दिशा, किंवा पूर्व दिशा य ठिकाणी लावावे. यामुळे जे काही आर्थिक समस्या असतील ते लवकर कमी होतील.

दुसरी वस्तू म्हणजे झाडे (plants प्लांट). हिरवी गार झाडे आपण आपल्या घरात ठेवल्या वर वातावरण चागले राहते आणि आपली प्रगती होण्यासाठी सुद्धा मदत होते. मनीप्लँट आणि बांबूचे झाड हे आपल्या घरात नक्की लावावे. मनीप्लँट हे आपली प्रगती साठी खुप चागले असते. या वाढ वरच्या दिशेने होण्यासाठी त्याला दोरी बांधावी जेणेकरून हे प्लँट वरच्या दिशेने जाईल. तसेच बांबूचे झाड सुद्धा जितक्या लवकर भहरेल तितकी आपली प्रगती लवकर चागली होईल. शक्यतो घरातील कोणतेही झाड जमिनीकडे झुकलेली नसावी. घरातील झाडे हे लावताना पूर्व, दक्षिण आणि अग्न्य दिशेस ठेवावी.

हे पण वाचा :-  आपल्यावर एखादे भयंकर संकट येणार असेल तर, हे पाच संकेत आपल्या आधीच मिळत असतात.

तिसरी वस्तू म्हणजे धन्वंतरी देवतेची प्रतिमा. धन्वंतरी देव हे समुद्र मंथनातून प्रगट झाले होते. धन्वंतरी देव आपले मन आणि शरीर चागले रहण्यासाठी मदत करतात त्यांची प्रतिमा आपल्या घरात ठेवावी आणि त्या प्रतिमा समोर एक कलश पाणी भरून ठेवावा आणि त्यातील पाणी थोडे थोडे करून दिवसभर पीत रहावे. या मुळे आपले आरोग्य चागले रहाते.

प्रत्येकाला आपल्या प्रगतीचे गुण गाणं झालेले आवडत असते. आणि अजून जास्त प्रगती व्हवी असेसुद्धा वाटत असते. या साठी लाल रंगाचा वापर करावा. लाल रंगाची कोणतीही वास्तू दक्षिण दिलेला लावावी शेवटची वस्तू म्हणजे भिंती वरचे घड्याळ. घड्याळ नेहमी पश्चिम भिंतीवर लावावे. शक्यतो ते मेटल चे असेल तर खुप चागले. यामुळे आपली आर्थिक प्रगती चागली होण्यास मदत होईल. या पाच वस्तू नक्की तुम्ही आपल्या घरात आवर्जून ठेवावी, याचा लाभ नक्की होतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.