लाईफस्टाईल

१५ ऑक्टोबर शुक्रवार विजयादशमी दसरा: सकाळी उठल्याबरोबर करा फक्त हे एक काम, लक्ष्मी घरात पाणी भरेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो १५ ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी आली आहे विजयादशमी ह्या विजयदशमीस दसरा देखील म्हणतात. वर्षांतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. ह्या दिवशी केलेले काही उपाय आपल्या जीवनातील समस्या दूर करतात शत्रूबाधातुन आपल्याला मुक्ती मिळते. तसेच धन, पैसे वैभव घराची बरकत वाढवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करता येतात.

मित्रांनो विजयदशमीच्या दिवशी सकाळी आपण उठून आपण आपल्या घराच्या दरवाजावर थोडेसे गंगाजल अवश्य शिंपडा. आपला घराचा मुख्य दरवाजा, त्याची जी चौकट आहे त्यावरती आपण थोडे गंगाजल टाका जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध पाण्यात चिमूटभर हळद टाकून आपण हे असे हळदीयुक्त जल आपण ह्या आपल्या मुख्य दारावर व चौकटीवर शिंपडायचे आहे.

मित्रांनो आपल्या घराची अंगणाची साफसफाई केल्यानंतर आणि स्वच्छ अंघोळ केल्यानंतर आपल्या घराचा जो उंभरठा आहे त्या उंबरठयावरती माता लक्ष्मीची पाऊले काढावीत. हि पाऊले घरात आत येणारी असावीत. दसरा आहे आणि ह्या शुभ मुहुर्तावरती आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत आहे. ह्या शुभ मुहूर्तवरती आपण मातेच्या स्वागतासाठी सज्ज व्हयला हवे. ह्या दिवशी आपण झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरणे करतात असे हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला अवश्य लावा. कारण ह्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.

आंब्याची पाने लावताना सात, नऊ, अकरा अश्या पद्धतीने लावली तर आपल्याला फळे आणखीनच चांगली मिळतात. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण थोडासा गुलाल सुद्धा टाकू शकता तसेच चौकटीला थोडासा गुलाल देखील टाकू शकता.

मित्रांनो हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात. आपण ह्या दिवशी फरशी पुसताना थोडेसे खडे मीठ आपण अवश्य त्या पाण्यात टाका सोबतच आपण तुरटी सुद्धा आपण त्या पाण्यात फिरवू शकता. अश्या पद्दतीने आपण फरशी पुसावी हयामुळे आपल्या घरातील सर्व नाकारात्मक शक्ती घरातून निघून जाते.

मित्रांनो आणखी एक उपाय म्हणजे आपण ह्या दिवशी सकाळी उठून एका वाटीत कुंकू टाकून त्यात आपण थोडेसे मोहरीचे तेल त्यात टाकून मिक्स करा व अश्या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बरोबर मध्यभागी एक स्वस्तिक रेखाटा. स्वस्तिकमध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो म्हणून असे स्वस्तिक आपण काढायचे आहे व त्या स्वस्तिकाच्या उजव्या व डाव्या बाजूला आपण दोन उभ्या दांड्या देखील काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात जी माता लक्ष्मी जी अली आहे ती घरात टिकून राहील.

विजयादशमीच्या दिवशी आपण नवीन वस्त्रे परिधान करावीत ज्यांना शक्य आहे त्यांनी गोरगरिबांना वस्त्रे दान द्यावीत. तसेच ह्या दिवशी आपण अन्नदान करावे अन्नदानामुळे समोरची व्यक्ती जर तृप्त झाली तर तिच्या आशीर्वादाने घरातील मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. आपण दान म्हणून दक्षिण देखील देऊ शकता. ज्या दिवशी मातेचे आगमन आपल्या घरात होत आहे त्या दिवशी घरात आनंदमय वातावरण असावे, घरात भांडणे, क्लेश, वादविवाद नको देवाने जे आपल्याला काही दिले आहे त्यासाठी परमेश्वराकडे त्यासाठी आभार मानावेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट