धार्मिक

३ जून शुक्रवार विनायक चतुर्थी, सर्व संकटे दूर करण्यासाठी बाप्पांची करा अशी सेवा.

मित्रांनो चतुर्थी हि तिथी महिन्यातून २ वेळा असते आणि चतुर्थी हि तिथी श्री गणेशांना समर्पित मानली जाते. कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. ३१ मे ला जेष्ठ महिन्याची अमावस्या समापलेली असून जेष्ठ महिन्याच्या शुल्क पक्षाची सुरवात झालेली आहे. त्यानुसार शुक्ल महिन्यातील चतुर्थी तिथी ३ जून ला येईल. चतुर्थीचे व्रत हे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते. असे मानले जाते कि हे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात व सुख समृद्धी येते.

आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत विनायक चतुर्थीच्या संबंधित महत्वाच्या गोष्टी. मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवारी २ जून ला दुपारी १२:१७ मिनीटांनी सुरु होईल व ती ३ जून दुपारी १:४१ मिनीटांनी समाप्त होत आहे. हिंदू धर्मातील बहुतेक सण हे उदय तिथीनुसार साजरे केले जातात. म्हणूनच विनायक चतुर्थीचे व्रत देखील ३ जून शुक्रवारच्या दिवशी पळाले जाईल.

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ वगरे आटपून आपण ह्या दिवशी हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पूजेचे स्थान स्वच्छ करून आपण गणपती बाप्पांची उपासना करावी, ध्यान करावे. देवघरात दिवा लावावा. तसेच श्री गणेशांना दुर्वा अर्पण कराव्यात, त्यांना ह्या दिवशी लाल फुले तसेच हळदी कुंकू लाडू मोदक उदबत्ती व दिवा अर्पण करावा. त्यानंतर आपण २१ दुर्वा ह्या आपण मनोभावे अर्पण कराव्यात ह्यानंतर आपण गणपतीच्या मंत्राचा जा करावा. विनायक चतुर्थीची व्रत कथा वाचावी व नंतर आरती करावी.

विनायक चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत ठेवावे व रात्री चंद्र दिसल्यानंतर आपण आपले व्रत सोडावे. मित्रांनो गणपतीची शक्ती बुद्धीची देवता म्हणून पूजा केली जाते. आणि चतुर्थीचे हे व्रत गणेशांना अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. जो कोणी हे व्रत पूर्ण भक्ती भावाने करतो त्याच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात व्यक्तीला चांगली बुद्धी मिळते आणि त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात. मित्रांनो विनायक चतुर्थीचे हे व्रत तुम्ही करता कि नाही हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

तसेच जर तुम्ही गणपती बाप्पांचे भक्त असाल तर श्री गणेशाय नमः असे कॉमेंट नक्की करा. मित्रांनो आजचा लेख तर तुम्हाला आवडला असेलच तर लेखाला लाइक व तुमच्या मित्रांना हा लेख नक्की शेयर नक्की करा.

टीप: लेखात दिली गेलेली माहिती हि धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्या मागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट