धार्मिक

४ फेब्रुवारी शुक्रवार गणेश जयंती नक्की करा हे पाच उपाय, सर्व इच्छा होतील पूर्ण.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो उद्या म्हणजेच ४ फेब्रुवारी शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी आहे गणेश जयंती जर वर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात गणेश जयंती साजरी केली जाते. ह्या दिवशी आपण गणेशांची मनोभावे पूजा करावी त्यानंतर आपण ह्या दिवशी व्रत ठेवावे. गणपती बाप्पांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्यांना अर्पण करा हयामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात.

गणपती बाप्पा हे सुख समृद्धी बुद्धीचे तसेच सफलता प्रदान करणारी देवता आहे. ह्या गणेश जयंती दिवशी करावयाचे काही विशेष उपाय आपण जाणून घेणार आहोत. गणेश जयंतीस आपण बाप्पांना मोदक नैवैद्य म्हणून नक्की अर्पण करा. श्री गणेशाला जी व्यक्ती मोदक अर्पण करते त्या व्यक्तीवर बाप्पा लवकर प्रसन्न होतात. मोदकांसोबत आपण बाप्प्पाला २१ दुर्वांची पेंडी देखील अर्पण करा. जेव्हा गणेशांच्या पोटात आग पडली होती तेव्हा त्यांच्या मातेने त्यांना दुर्वा दिल्या होत्या म्हणूनच त्यांना दुर्वा वाहतात. आणि जी व्यक्ती श्री गणेशाला दुर्वा अर्पण करते तिच्या जीवनातील सर्व दुःखे बाधा दूर होतात.

ह्या दिवशी आपण गणेश चालीसेचा पाठ करावा तसेच त्यांची ह्या दिवशी आपण आरती करावी ह्यामुळे बाप्पा जीवनातील सर्व अडचणी दूर करून सुख आनंदमय जीवन करतात. जर तुमच्या कुटुंबावर एखादे संकट आलेलं आहे किंवा काही संकट येणार आहे तर अश्या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी आपण गणेश जयंतीस गणेश कवचाचा पाठ करावा. ज्या प्रमाणे देवीदेवतांची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनांची देखील आपण पूजा कारवी त्यांना खाऊ घालावे.

गणेशांचे वाहन आहे ते म्हणजे मूषक म्हणजेच आपले उंदीर मामा त्यांना आपण खायला द्यावे कुठे तुम्हाला त्या दिवशी नजरेस पडले तर. जर घरात काही वादविवाद सारखे होत असतील तर आपण ह्या दिवशी शिवपरिवाराची म्हजेच शंकर पार्वती व गणेश अश्या फोटोची पूजा आपण करावी. धार्मिक मान्यता आहे कि अक्षदा म्हणजेच न तुटलेले अखंड तांदूळ व दुर्वा जरी आपण गणपतीला अर्पण केले तरी आपली गणपतीची पूजा संपन्न होते. ज्योतिषशास्त्रात दानधर्माचे माहात्म्य सांगितले गेले आहे.

ह्या गणेश जयंतीस आपण गोरगरिबांना आपल्या कुवतेप्रमाणे वस्त्र किंवा अन्नदान करावे. मित्रांनो ह्या गणेश जयंतीस आपण आपल्या घरात गणेश यंत्राचे स्थापन करावे ह्यामुळे घरात सुख समृद्धीचे आगमन आपल्या घरात होते. श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपण शुद्ध पाण्याने आपण जर अभिषेख करावा आणि सोबतच गणपती अथर्वशीर्षाचा जर आपण पाठ करावा ते झाल्यावर आपण खाव्याच्या मोदकांचा किंवा लाडूंचा नैवद्य दाखवावा व तो प्रसाद म्हणून आपण गोरगरिबात दान करावा. ह्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात तसेच आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करतात.

जे लोक नोकरी करतात आणि प्रोमोशन होत नसेल तर ते होण्यासाठी आपण ह्या दिवशी गणेशांना पाच साबूत हळकुंड अर्पण करावीत तसेच हि अर्पण करताना श्री गणाधिपतये नमः ह्या मंत्राचा सातत्याने करावा आपल्याला प्रोमोशनच्या संधी चालून येतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट