धार्मिक

९ सेप्टेंबर गणपती विसर्जन, बाप्पाला दाखवा हा एक नैवद्य, सर्व विघ्न होतील दूर.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका असा बाप्पा त्यांचे विसर्जन हे ९ सेप्टेंबर शुक्रवारी आहे, ह्या दिवशी आपण बाप्पाला विसर्जित करणार आहोत. पाहता पाहता अगदी १० दिवस कधी निघून गेले हे कळलेच नाही त्यातही जेष्ठा गौरी, गौरीपूजन करून अतिशय कार्थात झालो आपण. शुक्रवारी म्हणजेच ९ सेप्टेंबर ला अनंत चतुर्दशी आहे. फक्त ह्या अनंत चतुर्दशीला बाप्पांना विसर्जित करण्याआधी बाप्पाला हा एक नैवद्य अवश्य दाखवा. तुमची सर्व काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या सर्व बाप्पा पूर्ण करतील.

आजचा सांगत असलेला नैवद्य अनेकांना माहिती देखील असेल काही लोकांना माहिती नसेल तर आपल्या हातून ह्या १० दिवसांत जरी हा नैवद्य दाखवायचा विसरला असेल तरी काही काळजी नाही आपण ह्या दिवशी हा नैवद्य दाखवू शकता. तो नैवद्य म्हणजे पंचखाद्याचा नैवद्य, जुन्या परंपरेनुसार बनवला जाणारा हा एक सुंदर खाद्य पदार्थ आहे. आणि ह्या पंचखाद्याची चव अतिशय सुंदर लागते. पंच खाद्य म्हणजे पाच प्रकारचे पदार्थ एकत्रित. आणि हे सर्व पदार्थ ख पासून सुरवात होणारे होय.

पंचखाद्यमध्ये कोणते पदार्थ असतात?

पंचखाद्यामध्ये खारीक, खोबरे, खसखस, खडीसाखर, आणि खावा असे पाच पदार्थ असतात ह्या पाच पदार्थांचे मिश्रण म्हणजे पंचखाद्य. काही ठिकाणी खिसमिस देखील वापरतात. खिसमिस जरी वापरली तरी चालतात. पण हे पाचही पदार्थ, समप्रमाणात घ्यावेत आणि हे मिश्रण तयार घेऊन बाप्पांना पंचखाद्याचा नैवद्य जरूर दाखवावा.

ह्या दहा दिवसांत आपण आणखी एक नैवद्य आपण अवश्य दाखवावा तो म्हणजे गूळ आणि खोबरे ह्यांचा. तसे पहिले गेले तरी गणेश चतुर्थीच्या दिवशी हा गूळ खोबऱ्याचा नैवद्य दाखवावा. बाप्पा नक्की आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व बाप्पाच्या कृपेने पूर्ण होतील.

तर मित्रांनो ह्यावर्षी गणपती बाप्पा येऊन चालले देखील तर मग बोला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, सर्वाना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट