धार्मिक

गणपती विसर्जन केल्यानंतर नारळ, सुपारी व इतर वस्तूंचे काय करावे.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण सर्वानी आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली आहे. आपण श्रध्दाभावनेने गणपती बाप्पांचे पूजन करतो आणि १० दिवसानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करतो. आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतो.

बाप्पाना ज्या कापडावर बसिवले होते ते कापड, नारळ, सुपारी, कलश, दक्षिणा, तांदूळ ह्या सर्व वस्तू तश्याच राहतात ह्या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे ते कळत नाही आणि मग ह्या वस्तूंचा नेमका काय व कसा वापर करावा हे माहीत नसते. ह्या विषयीच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

जे वस्त्र आपण गणपती बापा बसवण्यासाठी वापर करतो ते आपण देवघरात हे वस्त्र खाली देवांना स्थानापन्न होण्यासाठी आपण वापरू शकतो. किंवा आपण हे वस्त्र देवपूजावेळी आपण देवांना पुसण्यासाठी करू शकतो. तसेच आपण त्यांचा उपयोग आपण कलश किंवा देवघरातील अनेक वस्तू असतात त्या पुसण्यासाठी करू शकतो.

ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायला पाण्याच्या ठिकाणी नदी इत्यादी ठिकाणी जातो त्यावेळी ज्या ठिकाणी आपण बाप्पांचे विसर्जन करतो त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन घरी यावे व गणपती बाप्पाना ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणी हि माती ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी.

कारण आपण गणपती बाप्पांच्या मूळ रूपाचे जरी आपण विसर्जन केले असेल तरी गणपती सूक्ष्म रूपाने गणपती बाप्पा तिथेच असतात. जी समई किंवा दिवा चालू असेल तो तसाच चालू ठेवावा त्यातील तेल संपेपर्यंत तो तसाच चालू ठेवावा. दुसऱ्या दिवशी ती माती आपण एकाद्या कुंडीत टाकून त्याला पाणी अर्पण करावे.

म्हणजे बाप्पांचा वास आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहील. त्यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर गोड पदार्थ करून खावेत. कलशाखालील व इतर ग्रहांसाठी घेतलेले धान्य आपण आपल्या दररोजच्या धान्यात परत ठेवून द्यावे. त्यामुळे आपल्या घरातील धान्याला बरकत येते.

तुम्ही ते तांदूळ धान्यात टाकण्याची इच्छा नसेल तर ते पक्ष्याना खाऊ घालावेत. सर्व सुपाऱ्या व हळकुंड असतील तर तो आपण तो आपल्या बागेत किस्वा घराबाहेर एकाद्या स्वच्छ ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यात ते पुरून द्यावे. म्हणजे त्याची झाडे येतील सुपारीचे झाड सजवटीसाठी खूप सुंदर दिसते.

कलशातील दक्षिणा हि घरातील कन्येला द्यावी जर आपल्या घरात कुवारी कन्या नसेल तर इतर बाहेरील कुवारी कन्येला दिले तरी चालते. कलशातील पाणी घरात शिंपडावे जर घरात बाथरूम व टॉयलेट सोडून बाकी ठिकाणी हे पाणी शिंपडावे व राहिलेलं पाणी कुंडीत ओतावे पण ते तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर कोणत्याही झाडांना अर्पण केले तरी चालते.

नारळाचा प्रसाद आपण सर्वाना द्यावा. पूजेची पाने फुले असतात ती निर्माल्य मध्ये टाकून ते पाण्यात सोडून द्यावे अश्या प्रकारे गणपतीच्या पूजेत वापरलेल्या सर्व वस्तूंचा योग्य पद्दतीने वापर करावा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट